* परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता
* जायकवाडी धरण भरले, चार दरवाजे उघडले, मोठा विसर्ग सुरु
* प्रकाश आंबेडकरांच्या सभेला लातुरात जोरदार प्रतिसाद
* लांबत गेलेल्या इतरांच्या भाषणांमुळे आंबेडकरांना घ्यावे लागले आटोपते
* वंचितचा लातुरचा उमेदवार घोषित न झाल्यानं मंचावरील अनेक उत्सुक संभाव्य उमेदवारांची निराशा
* बसवंतपूर, वरवंटी, रायवाडी, खोपेगाव आणि वासनगाव येथे आज आ. अमित देशमुख करणार विकासकामांचे भूमीपूजन
* मुख्यमंत्री म्हणतात, वाहतूक नियमभंगासाठी केंद्राने लागू केलेली दंडवाढ अमलात येणारच
* शरद पवार आज नाशिकमध्ये, घेतल्या पळपुट्या नेत्यांचा समाचार
* युती होईल पण गाफील राहू नका, उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना इशारा
* प्रामाणिक असतील तर मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय दिलेल्या रोजगाराची आकडेवारी द्यावी- अशोक चव्हाण
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी लढणार प्रत्येकी १२५ जागांवर, ३८ जागा मित्र पक्षांसाठी
* युतीने रिपाइंला द्याव्यात १० जागा, रामदास आठवले यांची मागणी
* शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि पदधिकाऱ्यांची मातोश्रीवर झाली बैठक
* भाजपाची महाजनादेश यात्रा आज कोल्हापूर आणि सांगलीत
* सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते- अमोल कोल्हे
* लग्न नाही निवडणूक महत्वाची, लढायला तयार आहे- आदित्य ठाकरे
* युतीची घोषणा १९ सप्टेंबरला घोषणा होण्याची शक्यता
* उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
* राष्ट्रवादीनं मला किमान सहनशिलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता- उदयनराजे भोसले
* सातार्यात होणार मेडीकल कॉलेज, उदयनराजेंच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
* एक देश एक भाषा, अमित शाह यांच्या आवाहनाला तामिळनाडूचा विरोध
* कांद्याची आवक घटली, ४० ते ५० रुपयांवर पोचला भाव
* येत्या नोव्हेंबर महिन्यापासून अयोध्येत सुरु होणार राम मंदिराची उभारणी- सुब्रमण्यम स्वामी
* अभिनेता संजय दत्तने घेतली नितीन गडकरी यांची भेट
* इंग्लंडमधलं ३५ कोटी रुपये किमतीचं सोन्याचं कमोड गेलं चोरीला
* अतिरेकी हल्ल्यांमुळे सौदी अरेबियातील तेलाचे उत्पादन आले निम्म्यावर
* भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द
Comments