* लातुरात रात्री दोन तास झाला मुसळधार पाऊस, परभणीतही जोरदार
* रात्री साडे अकराच्या सुमारास लातूर मनपा आवारातील गुलमोहराचे मोठे झाड कोसळले, भल्या सकाळी हटवले
* लातुरच्या ठोक भाजी बाजारात शिरले पाणी; घाण आणि चिखलाचा राडा!
* आ. अमित देशमुख यांच्या हस्ते आज अनेक ठिकाणी विकास कामांचे लोकार्पण, पदयात्रा
* औरंगाबादच्या जायकवाडी धरणात ९९ टक्के पाणी, गोदावरीत पाणी सोडले
* राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता
* शिवसेना पाच ते दहा आमदारांना पुन्हा उमेदवारी देणार नाही
* लवकरच भाजपात प्रवेश करणार, मुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास- नारायण राणे
* जिंकेपर्यंत घरी परतणार नाही, आपण दिला शब्द- शरद पवार
* निवडणूक आयोगाची आज मुंबईत तातडीची बैठक, दोन दिवसात निवडणूक घोषणेची शक्यता
* विधानसभेसाठी उमेदवारांची यादी निश्चित करा, राज ठाकरे यांचे आदेश
* युतीचे जागावाटप झाल्यानंतरच येणार राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
* उदयनराजे यांच्या विरोधात मजबूत उमेदवार शोधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु
* उर्मिला मातोंडकर कुठल्याही पक्षात जाणार नाही
* पक्ष सोडून गेलेल्यांचं नाव निवडणुकांनंतर इतिहासजमा होईल- शरद पवार
* नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरु करण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार- मुख्यमंत्री
* महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूची लागण, महिनाभरात १५ जणांचा मृत्यू
* दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक
* नरेंद्र मोदी देशाचे राष्ट्रपिता, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून उपाधी, राष्ट्रवादीचा आक्षेप
* महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधानांच्या दौर्यामुळं नाशिकात दोन दिवस मद्यविक्री बंद
* ठाण्यात तीन मगर तस्करांना अटक, दोन मगरींची सुटका
* जीएसटीमुळे पारले जी कंपनीने केली उत्पादनात दहा टक्क्यांची कपात
* चार ड्राय डे रद्द करण्याचा प्रस्ताव, मद्यविक्री धोरणात होणार बदल
* सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांनी वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा
* अयोध्या प्रकरणी सुनावणी आणखी किती दिवस करायची? सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
* १७ नोव्हेंबरपूर्वी अयोध्या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता
* २०१८ मध्ये हेल्मेट न घातल्यानं भारतात ४३,६०० जणांचा मृत्यू
* आता पीएफवर मिळणार ८.६५ टक्के व्याज
* सौदी अरेबियातील इंधन उत्पादन घटले, पेट्रोल पाच ते सहा रुपयांनी वाढणार
* ८७ दिवस पुरेल इतकेच कच्चे तेल भारताकडे शिल्लक
* मागच्या चार वर्षात रेल्वे स्टेशनवर हरवलेल्या १४ हजार मुलांची घरवापसी
* भारताने केली अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, ७० किलोमीटरची क्षमता
* पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताकडे घेण्याच्या हालचाली सुरु
* पाकिस्तानी मंत्र्यांकडून मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
Comments