* सत्तेसाठी सरकारने सत्तेचा बाजार मांडला- आ. अमित देशमुख
* केंद्राने प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दरमहा दहा हजार द्यावेत- लातुरात अर्थतज्ञ अनिल बोकील
* राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार घोषित
* परळीतून धनंजय मुंडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, केज नमिता मुंदडा, बीड संदीप क्षिरसागर तर गेवराईतून विजयसिंह पंडीत
* परळीत भावा बहिणीत तर बीडमध्ये काका पुतण्यात लढत
* मीच परळीची आमदार होणार, पंकजा मुंडे यांचा दावा
* राष्ट्रवादीचे नेते कमकुवत, कॅप्टन पवारांना बीडमध्ये येऊन करावी लागते उमेदवारांची घोषणा- पंकजा मुंडे
* कॉंग्रेसच्या ५० उमेदवारांची यादी २० सप्टेंबरला जाहीर होणार
* विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चात वाढ करण्याची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मागणी
* १४४ जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता- दिवाकर रावते
* काँग्रेसवाले भाजपचे गुलाम, राष्ट्रवादीला मोजत नाहीत- प्रकाश आंबेडकर
* वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढणार
* महाजनादेश यात्रेचा आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये समारोप
* पंतप्रधानांच्या सभेला कांद्यासह कुठलीही शेती उत्पादने अन पिशव्याही आणण्यास मनाई
* दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक घ्या, काही राजकीय पक्षांची मागणी
* कागदी मतदान पत्रिका इतिहासजमा, इव्हीएमवरच होणार मतदान, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
* कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबईतील शाळांना अतिवृष्टीमुळी सुटी
* मुंबईत रात्रभर पाऊस, घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन
* दिनेश मोंगिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
* रेल्वे कर्मचार्यांना ७८ टक्के दिवाळी बोनस, ११ लाख जणांना होणार फायदा
* १८ ऑक्टोबर पर्यंत अयोध्या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता
* मुदतीत युक्तीवाद संपवा सर्वोच्च न्यायालयाची सूचना
* भारताचे नागरिक नसणार्यांना देशाबाहेर काढले जाईल- अमित शाह
* कोणत्याच भाषेची सक्ती करु नका- अभिनेता रजनीकांत
* ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांना दाऊद इब्राहीम याच्या नावाने मिळाली धमकी
* एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई सुरु
* पश्चिम बंगालचे नाव बदलण्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार- ममता बॅनर्जी
* इ सिगारेटवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
* ०२ ऑक्टोबरपासून प्लास्टीक पूर्णपणे हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
* पेट्रोल २५ तर डिझेल २४ पैशांनी वाढले
* कश्मीरातून संचारबंदी हटत नाही तोपर्यंत भारताशी चर्चा करणार नाही- इम्रान खान
* अमेरिका दौर्यावर निघालेल्या पंतप्रधान मोदींना हवाई हद्द वापरण्यास पाकिस्तानचा विरोध
* दुसर्या टी-२० सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ०७ गडी राखून विजय
Comments