HOME   महत्वाच्या घडामोडी

जपानी पद्धतीने वृक्षारोपण, पर्यावरणासाठी लातुरात मानवी साखळी, आज कॉंग्रेसची यादी, एमआयएम-वंचित पुन्हा एकत्र, मोदींच्या सभेत खडसे फक्त श्रोता, कैदी चालवणार पंप.....२० सप्टेंबर २०१९


जपानी पद्धतीने वृक्षारोपण, पर्यावरणासाठी लातुरात मानवी साखळी, आज कॉंग्रेसची यादी, एमआयएम-वंचित पुन्हा एकत्र, मोदींच्या सभेत खडसे फक्त श्रोता, कैदी चालवणार पंप.....२० सप्टेंबर २०१९

* २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान बाभळगावच्या कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात युवक महोत्सव
* आज लातुरात पर्यावरण संरक्षण चळवळीच्या समर्थनार्थ सोमाणी व ज्ञानप्रकाशच्या विद्यार्थ्यांची मानवी साखळी
* दयानंद सभागृहात रविवारी स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने 'अपरिचित पु.ल.’ कार्यक्रमाचे आयोजन
* लातूर ग्रामीण मतदारसंघात नवीनंगणवाडी बांधकामासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर, रमेश कराड यांच्या प्रयत्नांना यश
* लातुरच्या सुमन संस्कार प्रेप स्कूलने केले जपानी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण
* कॉंग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
* विधानसभा निवडणुकीसाठी राजीव सातव कॉंग्रेसचे मराठवाडा प्रभारी
* एमआयएम आणि वंचित विकास आघाडी पुन्हा एकत्र येण्यास तयार
* कुलूप त्यांनीच लावलं होतं, चावी त्यांच्याकडेच, त्यांनीच उघडावं, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
* निवडणूक लढवण्याबबत आज मनसेच्या वरिष्ठांची बैठक
* शरद पवारांची परभणीत सभा, तलवार भेट देण्यावरुन कार्यकर्त्यात गोंधळ
* चंद्रकांत पाटील कुठूनही उभे राहू द्या विरोधात लढणारच- राजू शेट्टी
* २२ सप्टेंबरला भाजपाची आणखी एक मेगा भरती, अमित शाह मुंबई दौर्‍यावर
* शिवसेना भाजपातील जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न अमित शाह करणार
* शिवसेनेला १४४ जागा न दिल्यास युती होणार नाही- खासदार संजय राऊत
* मनसेची मराठी माणसाबाबतची भूमिका पटत नाही विधानसभेला त्यांना सोबत घेऊ शकत नाही: प्रकाश आंबेडकर
* ममता बॅनर्जी आज घेणार अमित शाह यांची भेट
* आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांची आमदारकी रद्द
* नाशिकमधील मोदींच्या सभेवेळी काळे कपडे घालण्यास केली होती मनाई
* एकनाथ खडसे होते पंतप्रधानांच्या नाशिकच्या सभेवेळी व्यासपिठावर, निभावली फक्त श्रोत्याची भूमिका
* आरकेएस भदौरिया नवे वायूदल प्रमुख
* पी चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी तीन ऑक्टोबरपर्यंत वाढवली
* पुण्यात कोयते विक्रेत्यांवर कारवाई, तीनशे कोयते जप्त
* केरळात कारागृहाबाहेर पेट्रोल पंप, कैदी चालवणार
* मुंबईच्या अनेक भागात गॅस गळतीच्या तक्रारी
* मुंबईच्या चेंबूरमध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनीत गॅस गळती, सतर्कतेचा इशारा
* लासलगाव बाजार समितीत कांद्याला ५१०० रुपयांचा भाव
* आतापर्यंत उज्वला योजनेतंर्गत आठ कोटी गॅस जोडण्या
* महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी औरंगाबादच्या क्रांती चौकात निदर्शने
* भिवंडी: पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात कारवाई; लाखो टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त
* मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट १५ हजारांचा बोनस
* पंढरपुरात पहिलीच्या विद्यार्थ्यावर अश्लीलतेचा आरोप, गुन्हा दाखल, विद्यार्थ्याला पुन्हा घेतले शाळेत
* हॉरर फिल्म्सचे किंग दिग्दर्शक श्याम रामसे यांचे निधन


Comments

Top