लातूर: भाजपा-सेना भूलथापा देऊन सत्तेवर आले पण ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या समस्या आजही कायम ठेवत सर्व सामान्य माणसापासून सर्व क्षेत्रातील लोकांचा भ्रमनिरास केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आता ही योग्य वेळ आली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे सांगून विकासाची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली.
लातूर विधानसभा मतदार संघातील बोरगाव काळे, मुरुड शहरातील तब्बल १६ ठिकाणी विविध कॉलनी, संस्था, सोसायटी, वस्ती येथे जाऊन मतदारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी विविध ठिकाणी ग्रामस्थ, मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या अनेक विकास कामे रखडली आहेत अशा समस्या मतदारांनी मांडल्या. गेली ३५ वर्ष या भागांतील अनेक विकासाची कामे झालेली आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांत या सरकारने काही केले आहे का? असा सवाल करीत एकतरी विकास काम दाखवा, नोकरी मिळाली का? उद्योग सुरू झाले का? याचं उत्तर काहीच नाही. त्यामुळे येणारे सरकार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे असणार असून त्यासाठी आपण सर्वांनी मिळून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे असून विकासाची काळजी तुम्ही करू नका आपल्या ज्या समस्या आहेत त्या सोडविणार आहोत असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नाथसिंह देशमुख, जिल्हा काँग्रेस माध्यम प्रमुख हारिराम कुलकर्णी, उपस्थित होते. या बैठकीला युवक काँग्रेसचे अमर मोरे, डॉ दिनेश नवगिरे, ईश्वर चांडक, दीपक पठाडे, उध्दव सवासे, गोविंद घुटे, योगेश देशमुख, रामानंद जाधव, कुंडलिक आदमाने, भगवान देशमुख, सुनील पाटील, बाबासाहेब पाटील, निळकंठ काळे, सय्यद गणी, बाळू आदमाने, उपसरपंच कैलास काळे, सतीश काळे, बापूराव शिंदे, भारत लाड, जगण चव्हाण, सतीश पाटील, विविध समाजाचे पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, माजी सरपंच, संचालक मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुरुडमध्ये १६ बैठका!
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी एकाच दिवशी मुरुड येथील शहरात तब्बल १६ बैठका घेऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक वस्त्यांवर जाऊन तेथील मतदारांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाची साक्ष देणाऱ्या योजनेच्या कार्याला लोकांनी उजाळा दिला.
Comments