लातूर: लातूरचा नागरिक व व्यापारी हे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी वाढविलेल्या भरमसाठ मालमत्ता करवाढ यामुळे त्रस्त असून काँग्रेस महाआघाडीचे सरकार येताच सर्वात आधी वाढलेले कर कमी करून लातूरवासियांना दिलासा देणे याला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले ते जनसंपर्क अभियानांतर्गत आयोजित संवाद बैठकीत बोलत होते.
शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अमित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसंपर्क अभियानांतर्गत लातूर शहरातील जुनी कापड गल्ली भागातील अमित इटकर यांच्या विशाल मेटल या ठिकाणी भेट दिली व व्यापारी बांधवांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, आज विद्यमान सत्तधार्यांमुळे लातूरचा नागरिक व व्यापारी यांच्या पदरात गेल्या पाच वर्षात काहीच पडले नाही. लातूर शहरातील मालमत्ता कर, पाणी पट्टी कर, मनपा गाळे भाडेवाढ, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी भरमसाठ वाढविली आहे. यामुळे लातूरवासियासह येथील व्यापारी त्रस्त असून काँग्रेस महा आघाडीचे सरकार येताच सर्वात आधी वाढलेले कर कमी करून लातूरवासियांना दिलासा देणे याला प्राधान्य दिले जाईल. दरम्यान गंजगोलाई ते जुनी कापड लाईन भागात पदयात्रा काढून आमदार अमित देशमुख यांनी विजय रबर स्टॅम्प, जनता ड्राय फ्रुट, प्रभू उकंडे यासह परिसरातील दुकानदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महा आघाडी उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देऊन सत्ता परिवर्तन करावे असे आवाहन देखील आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित व्यापारी बांधवांना केले. यावेळी श्रीकांत इटकर, रवी इटकर, दिनेश नानजकर, प्रशांत पुनपाळे, अमित इटकर, विशाल इटकर, राघवेंद्र इटकर, शेख मुख्तार हाजिसाब, संजय काथवटे, विक्रांत गोजमगुंडे, समीर डांगरे, दिनेश गोजमगुंडे, रफिक सय्यद गणी,चंद्रकांत साळुंके, गजानन झरकर, अजित वानरे, श्रीशैल्य गडगडे, अनिल डोळे, बालाजी दहातोंडे, किरण मैंदर्गे, महादेव भंडारे, सतीश हलवाई, शिवराज लोखंडे, स्वप्नील कंदले, सिकंदर पटेल यांच्यासह जुनी कापड गल्ली भागातील व्यापारी बांधव उपस्थित होते.
Comments