लातूर: उजनीच्या पाण्याचे आश्वासन मागील निवडणुकीत विद्यमान सरकारने लातुरवासियांना दिले परंतु आश्वासन पूर्ती केली नाही, अशा भूलथापा देणाऱ्या सरकारवर विश्वास न ठेवता मतदारांनी काँग्रेस महाआघाडीला मताधिक्य द्यावे. राज्यात महाआघाडीची सत्ता येताच लातूरला तर उजनीचे पाणी मिळेल शिवाय लातूर शहरा शेजारील गावांना देखील नळाद्वारे उजनीच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. लातूर शहरासह शेजारील गावातल्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची दुर्दैवी वेळ भविष्यात येणार नाही, अशा शब्दात आमदार अमित देशमुख यांनी खाडगाव वासियांना आश्वस्त केले. ते विधानसभा निवडणूक प्रचारारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
विधानसभा निवडणूक २०१९ च्या प्रचाराची रणधुमाळी आता रंगत चालली आहे. लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस महा आघाडीचे उमेदवार माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ खाडगाव या ठिकाणी प्रचार सभा पार पडली. यावेळी बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज ही सभा होत आहे. तीही पावसात आणि याला खाडगाववासियानी दिलेला प्रतिसाद दिल्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे. खाडगाव तसं छोटं गाव मात्र खाडगाव आणि लातूर यात कधीही कसलाही दुजाभाव विलासराव देशमुख यांच्या पासून आजतागायत कधी केला नाही यापुढे देखील केला जाणार नाही. या सभेसाठी ज्यांना मतदानाचा अधिकार नाही अशी बच्चे कंपनी येथे उपस्थित असून ही २०२४-२०२९ च्या विधासभेसाठीची अॅडव्हास बुकिंग आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही!
या प्रचार सभेत चंद्रकांत साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, विक्रम हिप्परकर, प्रा. सुधीर आनवले, अनिल बारबोले, तात्यासाहेब देशमुख, योगेश पाटील, दौलत देशमुख, भीमा साळुंके, शरद देशमुख, सचिन गंगावणे, अय्युब मुजावर, दौलत साळुंके, रमाकांत मगर, सपना पाटील, सरिता देशमुख, नंदा मगर, सारिका मस्के यांच्यासह सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यांच्यासह खाडगाव येथील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments