HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य, कॉंग्रेसने ठेवला देश एकसंघ, अजित पवारांची ५२ उत्तरे, राष्ट्रवादीत नेत्यांशिवाय कुणी नाही.....१५ ऑक्टोबर १९


लातुरच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य, कॉंग्रेसने ठेवला देश एकसंघ, अजित पवारांची ५२ उत्तरे, राष्ट्रवादीत नेत्यांशिवाय कुणी नाही.....१५ ऑक्टोबर १९

* देशाला एकसंघ ठेवण्याचं काम कॉंग्रेसनं केलं- शिवराज पाटील चाकूरकर
* भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ १६ ऑक्टोबर रोजी औसा दौऱ्यावर, अनेक ठिकाणी कार्यक्रम
* संभाजी पाटील निलंगेकरांची ग्रामीण भागात जन आशीर्वाद यात्रा, मोठा प्रतिसाद
* लातूरच्या भोई गल्लीतील संत तुळशिराम मठात अमित देशमुख यांनी घेतले दर्शन
* एक वर्षात औशाच्या विकासाची गाडी रुळावर आणली- अभिमन्यू पवार
* लातुरच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊ- लातुरच्या गुजराती बांधवांच्या बैठकीत किरीट सोमय्या
* बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित
* सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीने विचारलेल्या ५७ पैकी ५२ प्रश्नांची अजित पवारांनी दिली उत्तरे
* जम्मू काश्मीरात पूर्ववत झाली मोबाईल सेवा
* हाफीज सईदवर कारवाई करा, अमेरिकेची पाकला सूचना
* पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवूनच दाखवू- रामदास आठवले
* कॉंग्रेसच्या ३७० कलमावरील प्रेमामुळे अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला- नरेंद्र मोदी
* बाळासाहेबांच्या अटकेचा प्रश्न केव्हाच मिटलाय, फोकस बदलू नका, इडीच्या कारवाईवर लक्ष ठेवा- छगन भुजबळ
* कॉंग्रेसकडे नेते नाहीत, राष्ट्रवादीत नेत्यांशिवाय कुणी नाही- मुख्यमंत्री फडणवीस
* बाळासाहेबांनी त्यांचे म्हणणे माझ्यावर किंवा उद्धववर कधीच लादले नाही- राज ठाकरे
* पंजाब महाराष्ट्र बँकेतून आता ४० हजार रुपये काढता येणार
* एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परिक्षांचे नवे वेळापत्रक बदलण्याची कला शिक्षकांची मागणी
* ईव्हीएमच्या विरोधातील लढाईला देशातून साथ मिळाली नाही- राज ठाकरे
* भाजपवाले शिवसेनेची रोज इज्जत काढतात, त्यांना काही वाटत नाही- राज ठाकरे
* वल्लभभाईंचा पुतळा उभा राहतो शिवरायांचे स्मारक मात्र होत नाही- राज ठाकरे
* मनसेचा उमेदवार चंपाची अर्थात चंद्रकांत पाटलांची चंपी करणार- राज ठाकरे
* वाहन उद्योगातील मंदीमुळे किमान दहा लाख लोकांचा रोजगार जाणार
* विधानसभा निवडणुकीमुळे पूरग्रस्त गावांतील पुनर्वसन रखडले
* हिंदूराष्ट्र ही संघाची संकल्पना अमान्य- मायवती
* देवेंद्र फडणवीस यांनी जपून बोलावे- शरद पवार
* पंतप्रधान, गृहमंत्री यांना माझे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही- शरद पवार
* महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मद्याचा अवैध साठा जप्त


Comments

Top