HOME   महत्वाच्या घडामोडी

रितेश देशमुखांचा आज रोड शो, औशात बजरंगाची कमाल, वकिलांशी संवाद, मुख्यमंत्र्यांना धमकी, सलमानचा शेरा शिवसेनेत.....१९ ऑक्टोबर२०१९


रितेश देशमुखांचा आज रोड शो, औशात बजरंगाची कमाल, वकिलांशी संवाद, मुख्यमंत्र्यांना धमकी, सलमानचा शेरा शिवसेनेत.....१९ ऑक्टोबर२०१९

* अभिनेता रितेश देशमुख यांची आज लातुरात अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ रोड शो आणि सभा
* अमित देशमुख यांच्या गंगापुरातील सभेला जोरदार प्रतिसाद
* अमित देशमुख यांनी घेतली वकील मंडळाची भेट, वकिलांशी साधला संवाद
* विविध समाजिक संघटना आणि संस्थांनी दिला अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांना पाठिंबा
* पाठिंबा देणार्‍यात महात्मा फुले समता परिषद, भीमशक्ती, कोब्रा संघटना, दलित महासंघ, जय महाराष्ट्र सेनेचा समावेश
* औशात अपक्ष उमेदवार बजरंग जाधव यांव्या प्रचार रॅलीला विराट प्रतिसाद
* औशात प्रचंड पाणी टंचाई असताना आमदार दहा वर्षे काय करीत होते? अभिमन्यू पवार यांचा सवाल
* औशात दोन उमेदवारांनी दिला अभिमन्यू पवार यांना पाठिंबा
* मतदारांशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही, अरविंद पाटील निलंगेकर यांची ग्वाही
* जेलमध्ये असलेले आ. रमेश कदम सापडले ठाण्याच्या एका सोसायटीत
* महायुतीला १९४ जागा मिळण्याची शक्यता, युती करुनही जागा वाढणार नसल्याचा अंदाज
* सातार्‍यात शरद पवार यांनी केले भर पावसात भाषण
* आपण मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही, इडीच्या चौकशीला घाबरत नाही- शरद पवार
* चंद्रकांत पाटलांचं सगळं आयुष्य कोल्हापुरात गेलं मग कोथरुडमधून का उभे? राज ठाकरे यांचा सवाल
* प्रफुल्ल पटेल यांची इडीने केली १२ तास तास
* तिकीट कापले तरी चंद्रकांत बावनकुळे आमचा हिरा- मुख्यमंत्री
* मुख्यमंत्र्यांना आलं धमकीचं पत्र, लोहा तालुक्यातील एका खेड्यातून आले पत्र
* मुंबईत सुप्रिया सुळे यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांनी केली तपासणी
* मराठवाड्याचे सुपुत्र शरद बोबडे यांची सरन्याधीशपदासाठी शिफारस
* राहूल गांधींनी हरियाणात खेळले क्रिकेट
* राम मंदिराच्या सुनावणीवेळी नकाशा फाडणार्‍या वकिलाविरुद्ध दिल्ली ठाण्यात तक्रार
* इ कॉमर्स कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या ऑफर्सची होणार तपासणी
* अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून मिळाली सुटी
* सलमान खानचा अंगरक्षक शेरा शिवसेनेत प्रवेश
* आज अमित शाह, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा
* पी. चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केले आरोपपत्र
* कर चुकवणार्‍यांना सोडले जाणार नाही- पंतप्रधान
* भारतीय रेल्वेचे खासगीकरन होणार नाही: रेल्वेमंत्री पियूष गोयल


Comments

Top