HOME   महत्वाच्या घडामोडी

दोघांनाच लाखापेक्षा अधिक, भाउ-बहीण आणि काका-पुतण्याचा संघर्ष, नोटाला २७ हजार पाचशे, ठाकरे परिवारात पहिला आमदार.....२५ ऑक्टोबर २०१९


दोघांनाच लाखापेक्षा अधिक, भाउ-बहीण आणि काका-पुतण्याचा संघर्ष, नोटाला २७ हजार पाचशे, ठाकरे परिवारात पहिला आमदार.....२५ ऑक्टोबर २०१९

* लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात फक्त देशमुख बंधुंनी मिळवली लाखापेक्षा अधिक मते
* औशात मतमोजणीवेळी बंद पडलेली १२ एव्हीएम रात्री नऊ वाजता झाली सुरु
* वंचितमुळे आ. अमित देशमुख यांच्या मताधिक्यात झाली घट, मताधिक्य आले ४० हजार ३२१
* लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपचे बहुतांश कार्यकर्ते शिवसेनेच्या प्रचारापासून राहिले दूर
* लातूर ग्रामीण मतदारसंघात नोटाने घेतली २७,५०० मते
* उदगीरमध्ये अनिल कांबळेंना उमेदवारी मिळाल्याने भालेरावांच्या समर्थकांनी पिरवली पाठ
* नांदेड जिल्ह्यात नऊपैकी चार जागा मिळाल्या कॉंग्रेसला
* नांदेडच्या भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा दणदणीत विजय
* राणा जगजितसिंहांकडून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचा पराभव
* बीडमध्ये पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी दिला काका जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड
* परळीत भावाने केला बहिणीचा पराभव
* सोलापुरच्या पंचरंगी लढतीत प्रणिती शिंदे यांचा निसटता विजय
* आदित्य ठाकरे, ठाकरे परिवारातील पहिले आमदार!
* निवडून आलेले १५ अपक्ष बंडखोर आमच्या संपर्कात- देवेंद्र फडणवीस
* प्रत्येकवेळी भाजपची अडचण समजून घेऊ शकत नाही, सत्तेत हवा निम्मा वाटा- उद्धव ठाकरे
* अजित पवार यांना मिळाले विक्रमी मताधिक्य
* एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत
* कनकवलीत शिवसेनेला धक्का, नितेश राणे विजयी
* काहीही होवो सत्ता युतीचीच येईल- मुख्यमंत्री
* शरद पवार यांनी घेतलेल्या कष्टामुळे आघाडीला चांगले यश
* १९ आयारामांना फटका, हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल पराभूत
* प्रामाणिक प्रश्रमांमुळेच जनतेने पाच वर्षांनंतरही निवडून दिलं- नरेंद्र मोदी
* पी चिदंबरम यांच्या कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ
* शिवसेनेसोबत जाण्याचे आमचे धोरण नाही- शरद पवार


Comments

Top