देवणी: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने शनिवारी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील शेतशिवारात जाऊन नुकसान झालेल्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शिवाय झालेल्या नुकृसानीची भरपाई देण्यासाठी शासन तत्पर आहे, काळजी करण्याची गरज नाही असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, जिल्हा कृषी अधिकारी गावसाने, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, चेअरमन दगडू सोळुंके, राहुल केंद्रे, ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सभापती बालाजी बिरादार, उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर, भाजयुमोचे प्रशांत पाटील, माजी उपसभापती तुकाराम पाटील, सरपंच प्रा. महेमुद सौदागर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी निलंगा तालुक्यातील शिरसी हंगरगा येथील शेतकरी श्रीमंत कोळी, हलगरा येथील गिरीधर पेठकर, खाजा पटेल, माधव माळेगावे, मुरलीधर रोळे, गोंविद गायकवाड, अंबुलगा येथील सलिम पटेल तर देवणी तालुक्यातील वलांडी येथील रामविलास बंग व बालाजी बिरादार तसेच शिरुर अनंतपाळ शहरासह तालुक्यातील साकोळ, पांढरवाडी, बोरी आदी गावातील पिकांसह पपई, केळी आणि नुकसान झालेल्या फुलशेतीचीही पाहणी केली.
Comments