HOME   महत्वाच्या घडामोडी

लातूर जिल्ह्यात १४४, सत्तेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, नवा महापौर २१ आधी, सेना आमदार जाणार अज्ञातस्थळी, इन्फोसिस अडचणीत.....०७ नोव्हेंबर २०१९


लातूर जिल्ह्यात १४४, सत्तेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, नवा महापौर २१ आधी, सेना आमदार जाणार अज्ञातस्थळी, इन्फोसिस अडचणीत.....०७ नोव्हेंबर २०१९

* अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात कलम १४४ लागू- जिल्हाधिकारी
* लातुरात नळांना मीटर्स बसवण्यासाठी घेणार पाणी परिषद- जिल्हाधिकारी जी श्रीकांत
* लातुरला दहा दिवसाड पाणी पुरवठा करण्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर
* लातूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त एक लाख ३८ हजार हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण
* लातुरच्या महापौरांची मुदत संपते २१ नोव्हेंबर रोजी, त्याआधी नवी निवड होणे आवश्यक
* औशात नव्या बसस्थानकाचे लवकरच भूमीपूजन
* विख्यात कवी कुमार विश्वास १४ डिसेंबर रोजी लातुरात
* कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात मांस आणि मद्य विक्रीला बंदी
* सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटण्याची शक्यता
* सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक
* शिवसेना आमदारांना अज्ञातस्थळी हलवले जाण्याची शक्यता
* कॉंग्रेस नेते आज सोनिया गांधी यांची भेट घेणार, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत होऊ शकतो निर्णय
* चंद्रकांत पाटील, सुधीर मुगंटीवारांचे शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट
* संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट
* सध्या महाराष्ट्रातल्या सत्ताकारणावर बोलण्यासारखं काहीच नाही- शरद पवार
* शिवसेना-भाजपाला जनतेने कौल दिलाय त्यांनीच सरकार बनवावं- शरद पवार
* कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट
* शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी गैर नाही- एकनाथ खडसे
* महाराष्ट्रात २० कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याचे एसआयटी तपासात उघड
* मंदीचा मोठा फटका आयटी कंपनी इन्फोसिसला
* शेतकर्‍यांच्या विमा प्रकरणी पुण्यातील विमा कंपनीच्या कार्यालयात शिवसैनिकांनी केली मोडतोड
* छ्गन भुजबळांचा दोन दिवसांचा नुकसानग्रत भागाचा दौरा
* चंद्रपूरच्या नदीपात्रात अडकलेल्या वाघाची अखेर झाली वनविभागाकडून सुटका, पण वाघाचा मृत्यू
* रस्त्यावर खड्डे पडल्याने शिर्डीजवळचा टोलनाका शिवसेनेने पाडला बंद
* ३१ डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणार
* अयोध्या प्रकरणी मौलाना अर्शद मदनी घेणार मोहन भागवतांची भेट
* अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गोरखपुरात पोलिसांनी केला फ्लॅग मार्च
* गुरमीत राम रहीमची सहकारी हनीप्रीतला जामीन मंजूर


Comments

Top