HOME   महत्वाच्या घडामोडी

ठाकरे घेणार आज पदभार, लातुरात चित्रपट महोत्सव, पंतप्रधानांच्या शुभेच्छा, शेतकर्‍यांचे समाधान करणार, शिवसैनिकांचा काश्मीरात जल्लोष.....२९ नोव्हेंबर २०१९


ठाकरे घेणार आज पदभार, लातुरात चित्रपट महोत्सव, पंतप्रधानांच्या शुभेच्छा, शेतकर्‍यांचे समाधान करणार, शिवसैनिकांचा काश्मीरात जल्लोष.....२९ नोव्हेंबर २०१९

* माकणीतून औशाला पाणी पुरवठा, नगराध्यक्ष अफसर शेख यांनी केला कामाचा शुभारंभ
* शनिवार आणि रविवारी लातुरच्या दयानंद सभागृहात चित्रपट महोत्सव
* लातुरच्या चित्रपट महोत्सवात ‘अस्तु, कासव, यलो आणि बाधा’ या चित्रपटांचं प्रदर्शन
* महाराष्ट्र बॅंकेच्या कर्मचार्‍यांनी कर्ज वसुलीसाठी लातुरातील थकबाकीदारांच्या घरासमोर केली निदर्शने
* उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला शिवाजी पार्कवर अभूतपूर्व उपस्थिती, राज्यभर आनंदोत्सव
* राष्ट्रवादीच्या वतीने छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
* शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, कॉंग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी घेतली शपथ
* जयंत पाटील यांना उप मुख्यमंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता
* उध्दव ठाकरे आज दुपारी एक वाजता घेणार मंत्रालयात पदभार
* शपथविधी सोहळ्याला उद्योजक आणि शेतकरीही हजर
* पंतप्रधानांनी दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
* शपथ घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले सिध्दीविनायकाचे दर्शन
* रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी २० कोटींचा निधी, ठाकरेंचा पहिला निर्णय
* शेतकर्‍यांचे समाधान होईल अशीच मदत करणार- उद्धव ठाकरे
* केंद्रानं महाराष्ट्राला मदतीचा हात पुढे करावा, सामनातून आवाहन
* माझी कुठलीही नाराजी नाही, मी बंड केलं नव्हतं, भूमिका घेतली होती- अजित पवार
* विधानसभा अध्यक्षपदासाठी अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची चर्चा
* आदर्शमुळे अशोक चव्हाण अडचणीत तर पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीचा विरोध
* आदर्श घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशीला पुन्हा सुरुवात होणार
* उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर काश्मीरातील शिवसैनिकांनीही केला जल्लोष
* आदरणीय बाळासाहेबांची आज खूप आठवण येतेय: सुप्रिया सुळे
* मोदी आणि शाह यांच्या खेळी महराष्ट्रात अयशस्वी- सोनिया गांधी
* संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवरून साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची हकालपट्टी
* रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होणार वाढ, सरकारने दिली मंजुरी
* एअर इंडीयाचं खाजगीकरण नाही केलं तर कंपनी बंद पडेल- सरकार
* व्हाट्सअ‍ॅपसारख्या माध्यमातील भारतीय नागरिकांच्या गोपनीयतेची जबाबदारी घेतली सरकारने
* सानिया मिर्झानं केलं पुन्हा टेनिस कोर्टवर आगमन


Comments

Top