HOME   महत्वाच्या घडामोडी

आज पाणी परिषद, चित्रपट महोत्सव, मुन्ना बदनाम हुआ, राष्ट्रवादीचा उप मुख्यमंत्री, मेट्रो कारशेडला स्थगिती, वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष.....३० नोव्हेंबर २०१९


आज पाणी परिषद, चित्रपट महोत्सव, मुन्ना बदनाम हुआ, राष्ट्रवादीचा उप मुख्यमंत्री, मेट्रो कारशेडला स्थगिती, वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष.....३० नोव्हेंबर २०१९

* आजपासून दोन दिवस लातुरच्या दयानंद सभागृहात मराठी चित्रपट महोत्सव
* लातुरच्या बार्शी मार्गावरील महिला तंत्रनिकेतनमध्ये दोन दिवसांची जल परिषद (H2O)
* खंडोबा यात्रेनिमित्त आज लातुरात कुस्ती स्पर्धा
* आजपासून दोन दिवसांचे विधीमंडळ अधिवेशन, आजच ठाकरे सरकारची शक्ती परिक्षा
* विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे जाणार
* विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आजच होणार देवेंद्र फडणवीस यांची निवड
* गोव्यातही राजकीय भूकंप घडवू- संजय राऊत
* बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला उद्धव ठाकरे यांनी दिली मूठमाती- नारायण राणे
* उप मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळणार- अजित पवार
* आज विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली लता मंगेशकर यांची भेट
* अभिनेत्री जया बच्चन यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा, शेतकरी आणि बेरोजगारांची प्रश्न सोडवण्याची अपेक्षा
* भारत श्रीलंकेला देणार ४५ कोटी डॉलर्सचे कर्ज
* १५ जानेवारीपासून हॉलमार्क असलेलेच दागिने विकणे सक्तीचे
* सोन्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने घेतला निर्णय
* ‘दबंग ३’ चा टीझर रिलीज, सलमान खानने गायले ‘मुन्ना बदनाम हुआ’ गाणे
* आरे कॉलनीतील मेट्रो कार शेडच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती
* मोदी-शाहांनी एक फोन केला असता तर युती टिकली असती- संजय राऊत
* दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
* माहिम, उस्मानाबाद आणि यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव
* नथुराम गोडसे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांनी मागितली माफी
* आदर्श प्रकरणात कसलीही नव्याने चौकशी केली जाणार नाही, इडीने केला खुलासा
* धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ समजून घ्या, खा. ओवेसींचा उद्धव ठाकरे यांना सल्ला
* मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
* महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजित कटके याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पटकावले रौप्यपदक


Comments

Top