HOME   महत्वाच्या घडामोडी

चारही बलात्कारी पोलिसांच्या गोळीबारात ठार, कांदा २०० वर, फडणवीस-मुंडेंचे निर्णय स्थगित, दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार, अजित पवारांना क्लीन चीट.....०६ डिसेंबर १९


चारही बलात्कारी पोलिसांच्या गोळीबारात ठार, कांदा २०० वर, फडणवीस-मुंडेंचे निर्णय स्थगित, दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार, अजित पवारांना क्लीन चीट.....०६ डिसेंबर १९

* हैद्राबादेतील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पळून जाताना पोलिसांच्या गोळीबारात ठार
* आज रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची आ. धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक
* आ. धीरज देशमुख यांच्या प्रयत्नातून पानगावातील रस्त्यांची सुरु झाली दुरुस्ती
* निलंगा तालुक्यातील नसलगा-गौर भागात टिप्परच्या धडकेत दोन तरुण ठार
* लातूर तालुक्यातील १४ हजार १९९ शेतकर्‍यांच्या खात्यांवर अतिवृष्टीचे अनुदान जमा
* पानगावातील डॉ. आंबेडकर स्मारकाचा उर्वरीत ७० लाखांचा निधी तातडीने द्यावा, आ. धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
* हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघांचाही मृत्यू
* सोलापुरात कांदा २०० रुपये किलो
* ठाकरे मंत्रीमंडळाचा दोन दिवसात होणार विस्तार
* एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांची बैठक, अनेक नेते होते उपस्थित
* एकनाथ खडसे यांना शिवसेनेत घेण्याचे काही प्रयत्न काही नेत्यांकडून सुरु
* जलयुक्त शिवार योजनेतील कथित भ्रष्टाचारामुळे योजनाच गुंडाळली जाण्याची शक्यता
* मुलगा नसल्यास सासू सासर्‍यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयावर, नव्या विधेयकातील तरतूद
* संसदेच्या हॉटेलातील खाद्यपदार्थांवरील सबसिडी खासदार सोडणार
* `पानिपत' चित्रपट प्रत्येक भारतीयांनी पहायला हवा, राज ठाकरे यांचे आवाहन
* हृतिक रोशन ठरला आशियातील सर्वात सेक्सी पुरुष
* पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात पंदतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर
* आज हैद्राबादेत वेस्ट इंडीजसोबत भारताचा पहिला टीट्वेंटी सामना
* सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना मिळाली क्लीनचिट, नियमबाह्य व्यवहार झाले नसल्याचा निर्वाळा
* मुंबईत २३ जानेवारीला होणार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
* अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाच्या कामांचा अहवाल पंतप्रधानांनी मागवला
* दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीच्या बसेसमध्ये बसणार ५५०० सीसीटीव्ही कॅमेरे
* व्हाट्सअ‍ॅपवर लवकरच येणार फिंगर प्रिंट लॉक
* पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांचे वेतन ठरविण्याच्या हालचाली सुरु
* देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या काही निर्णयांना ठाकरे सरकारकडून स्थगिती
* सहा आमदार, दोन खासदार परत येणार, कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा दावा


Comments

Top