* लातुरात घरफोडी करणार्या आरोपीकडून ३२,५५० रुपयांचा ऐवज जप्त
* रबी पीक विमा योजनेत लातूरचा समावेश करा, राष्ट्रवादीची मागणी
* बीडचे पोलिस शिपाई दिलीप केंद्रे यांनी डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
* ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात निधन, आज अंत्यसंस्कार
* मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन टप्प्यात शेतकर्यांना मिळणार कर्जमाफी
* कर्जमाफी करण्यासाठी सरकारने नेमली दोन पथकं
* कर्जमाफी करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या, शरद पवार यांची सरकारला सूचना
* एकनाथ खडसे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
* २३ किंवा २४ डिसेंबरला होणार मंत्रीमंडळाचा विस्तार
* जानेवारी महिन्यात मंत्रीमंडळाचा विस्तार करावा, अजित पवार यांची इच्छा
* तुम्ही पुन्हा येणार! नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी
* नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील ५९ याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार
* अतिक्रमण मोहीम सुरु केल्यापासून जोशी यांना आली होती दोन धमकीची पत्रं
* मद्यधुंद तरुणांचा नागपुरच्या आमदार निवासात गोंधळ, आमदारांना धमकावले, पैशाचीही केली मागणी
* अमरावतीत आई आणि मुलीवर सामुहिक बलात्कार, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
* महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग हीच भाजपाची वृत्ती: शिवसेनेची टीका
* ओडिशात ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
* आज मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे पैठण येथे दहन
* जीएसटी परिषदेची आज बैठक
* पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा, विशेष न्यायालयाचा निकाल
* विशाखापट्टणम येथे आज भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये दुसरा एकदिवसीय सामना
Comments