* लातूर मनपाच्या शहर वाहतूक विभागात दाखल झाल्या तीन बसेस, एकूण झाल्या १३
* नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आम्ही लातुरकरच्या वतीने सोमवारी तहसीलवर मोर्चा
* लातुरच्या शाहू चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्णत्वास, चबुतराही बांधला जाणार
* ऑनलाईन औषध विक्रीला लातुरच्या औषध विक्रेत्यांचा विरोध, अन्न-औषध प्रशासनाला दिले निवेदन
* निवळीच्या विलास साखर कारखान्याची निवडणूक जाहीर, पुढच्या महिन्यात १९ तारखेला मतदान
* उदगीरमध्ये आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला अटक
* रेणा साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिला पुरस्कार जाहीर
* पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत नटसम्राट श्रीराम लागू यांच्यावर झाले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
* सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांच्या सीबीआय चौकशीला सरकारचा नकार
* वचननाम्यानुसार शिवसेनेने मनपातील कर्मचार्यांसाठी उपलब्ध केली दहा रुपयात थाळी, अन्यत्रही लवकरच सुरु होणार
* महाराष्ट्रात १५ जिल्ह्यात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलने, काही ठिकाणी हिंसक वळण, परभणी, हिंगोली आणि बीडमध्ये दगडफेक
* खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केले शांततेचे आवाहन, म्हणाले हिंसक आंदोलन नुकसान करणारे
* विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
* केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी हातमिळवणी केली- नारायण राणे
* अजित पवार आमचे उप मुख्यमंत्री असतील- संजय राऊत
* फडणवीस सरकारच्या काळात ६६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची शक्यता- कॅग
* राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद
* ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलं मौनव्रत आंदोलन, निर्भयाच्या दोषींना तातडीने फाशी देण्याची मागणी
* उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेपेची शक्यता
* येत्या खरीप हंगामापूर्वी महाराष्ट्रातील शेतकर्यांना मिळणार कर्जमाफी- अजित पवार
* राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साडेबारा वाजता आज पुण्यात पत्रकार परिषद
* राज्यातील सरकारी कार्यालये होणार तंबाखूमुक्त, पथके नेमली जाणार
* महाराष्ट्रातील तोट्यातली महामंडळे बंद करावईत, कॅगची शिफारस
* हिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, कॉलेजना आज सुटी
* आठवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार
Comments