HOME   महत्वाच्या घडामोडी

भिडे म्हणतात हिंदू नपुंसक, शीव भोजन योजना मंजूर, अटलजींच्या पुतळ्याचं अनावरण, अजित पवार उप मुख्यमंत्री? सानिया भारतीय संघात.....२५ डिसेंबर १९


भिडे म्हणतात हिंदू नपुंसक, शीव भोजन योजना मंजूर, अटलजींच्या पुतळ्याचं अनावरण, अजित पवार उप मुख्यमंत्री? सानिया भारतीय संघात.....२५ डिसेंबर १९

* आज माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी अर्पण केली आदरांजली
* लातुरच्या प्रभाग ११ अ च्या निवडणुकीसाठी १० अर्ज वैध, २६ डिसेंबरपर्यंत अर्ज घेता येतील माघारी
* निम्न तेरणा प्रकल्पातून ३० डिसेंबर रोजी सिंचनासाठी पाणी सोडणार
* लातुरात ०४ ते ०६ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय युवक महोत्सव
* महात्मा फुले कर्जमाफी आणि शीव भोजन योजनेला मंत्रीमंडळाची मंजुरी
* आर्थिक मंदीमुळे अनेक कार कंपन्यांकडून २० हजार ते एक लाखांची सवलत
* काश्मिरातून सात हजार निमलष्करी दलातील जवानांना परत बोलावले
* राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू नपुंसक आणि वांझ- संभाजी भिडे गुरुजी
* सुरक्षा कपातीबाबत सचिन तेंडूलकर आणि सुनील गावस्कर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
* नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
* संचारबंदीमुळे राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी मेरठबाहेरच रोखले
* वनक्षेत्रात नववर्ष साजरे करण्यास मनाई
* फेडरेशन कपसाठी सानिया मिर्झा भारतीय संघात
* लखनौच्या लोकभवन येथे पंतप्रधान करणार अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण
* चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांची नियुक्ती होण्याची शक्यता
* हेमंत सोरेन २९ डिसेंबरला घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
* राज्यातील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
* एनआरसी आणि एनपीआर कायद्याचा कसलाही संबंध नाही- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
* उद्याच्या सूर्य ग्रहणामुळे ओडिशातील सरकारी कार्यालयांना सुटी
* नागपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
* भारतात ०१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत होणार जनगणना
* अंबानींच्या संपत्तीत एका वर्षात सव्वा लाख कोटींची वाढ
* कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी अद्याप अपूर्ण, विस्तार लांबला
* अजित पवार यांना उप मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता


Comments

Top