HOME   महत्वाच्या घडामोडी

अमित देशमुखांना कॅबिनेट, केदारनाथमध्ये हिम वर्षाव, चार शिवसैनिकांना अटक, मिग विमाने होणार निवृत्त, सर्वांनाच हिंदू म्हणणे अयोग्य.....२७ डिसेंबर २०१३


अमित देशमुखांना कॅबिनेट, केदारनाथमध्ये हिम वर्षाव, चार शिवसैनिकांना अटक, मिग विमाने होणार निवृत्त, सर्वांनाच हिंदू म्हणणे अयोग्य.....२७ डिसेंबर २०१३

* लातुरच्या क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांनी अनुभवले कंकणाकृती सूर्यग्रहण
* लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड ०६ जानेवारीला
* एक रकमी मालमत्ता कर भरल्यास लातूर मनपा देणार ७५ टक्के सवलत
* लातुरच्या प्रभाग ११ च्या निवडणुकीतून चौघांनी घेतली माघार
* आ. अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, सुत्रांची माहिती
* कॉंग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर
* केदारनाथमध्ये हिमवर्षाव, जनजीवन ठप्प
* वंचित बहुजन आघाडीने काढला नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुंबईत मोर्चा
* राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता
* शपथविधीसाठी विधानभवनात जोरदार तयारी सुरु
* ग्रहण काळात तुळजाभवानीची मूर्ती ठेवण्यात आली शुभ्र सोवळ्यात
* मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍याचे मुंडन करणार्‍या चार शिवसैनिकांना अटक
* भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, तासभर चर्चा
* एकनाथ खडसे यांच्या तक्रारीची भाजपा कार्याध्यक्षांनी घेतली दखल, फडणवीस, पंकजा मुंडेंना घेणार बोलावून
* मिग-२७ विमाने आज होणार वायूदलातून निवृत्त
* नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले ‘बाला...शैतान का साला’ गाण्यावर नृत्य
* भरतात राहणार्‍या सर्वांनाच हिंदू म्हणणे अयोग्य- रामदास आठवले
* आदित्य ठाकरे आणि अण्णा हजारे यांच्या संरक्षणात झाली वाढ, नारायण राणे आणि एकनाथ खडसे यांच्या संरक्षणात कपात
* जीएसटीच्या रचनेत होणार बदल, दरही वाढू शकतात
* यंदा आंबा उत्पादन घटणार, केवळ पाच टक्के मोहोर
* मंदीतून सावरण्यासाठी आयकरात कपात होण्याची शक्यता
* कॉंग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त उद्या मुंबईत संविधान बचाव रॅली
* राज्यातील साखर कारखान्यांनी केले १३४ लाख टन ऊसाचे गाळप
* भारतीय भाषणात पुढे, क्रीडा नैपुण्यात मागे- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
* नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात काही ठिकाणी सुरु होणार ‘फाईव्ह जी’ सेवा


Comments

Top