HOME   महत्वाच्या घडामोडी

अमित देशमुख कॅबिनेट मंत्री, मोहन भागवत लातुरात, ३६ आमदार होणार मंत्री, कर्नाटक बससेवा रद्द, मुंबईत खाजगी रेल्वे.....३० डिसेंबर २०१९


अमित देशमुख कॅबिनेट मंत्री, मोहन भागवत लातुरात, ३६ आमदार होणार मंत्री, कर्नाटक बससेवा रद्द, मुंबईत खाजगी रेल्वे.....३० डिसेंबर २०१९

* लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती आणि उप सभापतींची आज निवड
* लातूर महानगरपालिकेची आज होणारी सर्वसाधारण सभा रद्द
* सरसंघचालक मोहन भागवत आज लातुरात, सकाळीच होतील अंबाजोगाईकडे रवाना
* आ. अमित देशमुख कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले शपथविधीपूर्वीच अभिनंदन, सोशल मिडीयावर जाहिरात
* महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाण्याची शक्यता
* ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रीमंडळ विस्तार
* दुपारी एक वाजता विधानभवानात सुरु होणार शपथविधी
* कॉंग्रेसचे १० नेते घेणार मंत्रीपदाची शपथ, अशोक चव्हाण आणि अमित देशमुख आघाडीची नावं
* विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदमही असतील मंत्रीमंडळात
* मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सोनिया गांधी यांच्याशी झाली चर्चा
* एकूण ३६ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ
* तीन अपक्ष आमदारांना शिवसेनेकडून संधी, अब्दुल सत्तारांचा समावेश
* शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदयसम्राट म्हणत नाही- प्रकाश जावडेकर
* महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तूर्तास रद्द
* ४०० पोलिस अधिकारी, दहा हजार पोलिस कर्मचार्‍यांचा भिमा कोरेगावात कडक बंदोबस्त
* सीआरपीएफ जवानांना मिळणार वर्षभरात १०० सुट्ट्या
* मुंबईत लवकरच धावणार खाजगी रेल्वे
* राष्ट्रपतींच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
* खासदार संभाजीराजे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
* वाईट नेता मिळणं यात महाराष्ट्राची चूक नाही, पण त्याला साथ देणं ही चूक- अमृता फडणवीस
* सांगलीत शिवसैनिकांनी काढला कर्नाटक सरकारचा तिरडी मोर्चा
* अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ख्रिश्चन बांधवांनी काढला मोर्चा


Comments

Top