HOME   महत्वाच्या घडामोडी

वजनदार खात्यांसाठी रस्सीखेच, कोरेगावात विजयस्तंभाला अभिवादन, रेल्वे प्रवास भाड्यात वाढ, साईबाबांना २८७ कोटी, पोलिसात सखी कक्ष.....०१ जानेवारी २०२०


वजनदार खात्यांसाठी रस्सीखेच, कोरेगावात विजयस्तंभाला अभिवादन, रेल्वे प्रवास भाड्यात वाढ, साईबाबांना २८७ कोटी, पोलिसात सखी कक्ष.....०१ जानेवारी २०२०

* आजलातूर, संवाद एसएमएस वृत्तसेवा, लातूर बाजारच्या वतीनं नव्या वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा
* शेतकर्‍यांनी आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक करावे, लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन
* अटल भूजल योजनेत लातूर जिल्ह्याचा समावेश
* उप मुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांनी भिमा कोरेगाव येथे केले विजयस्तंभाला अभिवादन
* कोरेगावात प्रचंड बंदोबस्त, सोशल मिडीयावर पोलिसांची नजर
* रेल्वेच्या प्रवासी भाड्यात आजपासून वाढ, नव्या वर्षाची भेट!
* मुंबईच्या गोरेगावात भुयारी गटारात सफाईसाठी उतरलेल्या दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू
* राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे
* लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला
* महाराष्ट्रातील कॉंग्रेस मंत्र्यांनी घेतली सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी यांची भेट
* २०१९ मध्ये साईबाबांच्या चरणी झाले २८७ कोटी रुपयांचे दान
* लोणावळ्याच्या जमीन प्रकरणी धर्मेंद्र-हेमामालिनी कुटुंबियांच्या विरोधात खा. संजय काकडे यांनी दाखल केला कोर्टात दावा
* मंत्रीपद न मिळाल्याने आमदार संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी पुण्यात काँग्रेसचे कार्यालय फोडले
* पंचायत समितीचा उमेदवार पळवून नेल्याप्रकरणी खा. ओमराजे निंबाळकर यांच्याविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वजनदार खात्यांसाठी रस्सीखेच, पेच सुटेना
* आज अभिनेता नाना पाटेकर यांचा वाढदिवस
* एनईएफटी व्यवहाराला कसलेही शुल्क लागणार नाही
* आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क सक्तीचे
* महिलांच्या तक्रार निवारणासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सखी कक्ष
* नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या समुद्र किनार्‍यांवर लाखोंची गर्दी
* विचारसरणीशी तडजोड करु नका, महाराष्ट्रातील कॉंग्रेस मंत्र्यांना सोनिया गांधी यांची सूचना
* अजित पवारांनी नाकारले मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील दालन


Comments

Top