* चैत्यभूमीच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार- राज्यमंत्री संजय बनसोडे
* नव्या सरकारच्या कर्जमाफीच्या अध्यादेशाची लातुरच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होळी
* लातुरच्या जिल्हाधिकार्यांनी जाहीर केल्या तीन स्थानिक सुट्ट्या
* लातूर मनपाच्या मालमत्ता करवाढीच्या निषेधार्थ नगरसेवक प्रकाश पाठक यांनी केले महापौरांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन
* लातुरात एक लाखाची देशी-विदेशी दारु जप्त
* नांदेड, हिंगोली आणि वाशिममध्ये अवकाळी पाऊस
* जनतेनं आम्हाला बहुमत दिलं होतं पण शिवसेनेनं बेइमानी केली- देवेंद्र फडणवीस
* विजय मल्ल्याची मालमत्ता विकून बॅंका करणार थकित कर्जाची वसुली
* येत्या मार्चपासून १३० रुपयात पाहता येतील २०० वाहिन्या, ट्रायचा निर्णय
* शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी पक्षच बरा होता- भास्कर जाधव
* फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं, माझं राजकारण संपवण्याचा डाव- एकनाथ खडसे
* जनाधार असलेल्या निष्ठावानांना तिकीट दिलं नाही म्हणून भाजपाचं सरकार आलं नाही- एकनाथ खडसे
* पंतप्रधान आज कर्नाटकच्या दौर्यावर
* घरगुती गॅस सिलींडरच्या दरात एकोणावीस रुपये पन्नास पैशांनी वाढ
* खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता, कृषी आणि बांधकाम खात्यावरुन रस्सीखेच
* खातेवाटपाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांसोबत चालली चार तास बैठक
* शरद पवार यांनी दिली खातेवाटपाची यादी- अजित पवार
* मंत्रीपदावरुन उद्धव ठाकरे आणि तानाजी सावंत यांच्यात वाद
* मंत्रीपद न मिळाल्याने तानाजी सावंतांचे समर्थक काढणार शिवाजी पार्क ते मातोश्रीपर्यंत दंडवत यात्रा
* शिवसेनेचे नाराज नेते आज घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
* महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नाराज आमदारांनी महामंडळे मिळवण्यासाठी केले प्रयत्न सुरु
* पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपाकडून तयारी सुरु, अमित शाह शिकू लागले बांगला भाषा
* बेंगलोरच्या एमएस बालाजी या भाविकाने कोल्हापुरच्या महालक्ष्मीला अर्पण केला सव्वानऊ तोळे सोन्याचा हार
* इस्रोच्या ‘चांद्रयान तीन’ मोहिमेला सरकारने दिली परवानगी
* अयोध्येत १०० एकरात उभारणार श्रीरामलल्ला शहर
* आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ
Comments