HOME   महत्वाच्या घडामोडी

मोठ्या प्रतिक्षेनंतर खातेवाटप जाहीर

देशमुखांना वैद्यकीय शिक्षण, थोरातांना महसूल, अशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम


मोठ्या प्रतिक्षेनंतर खातेवाटप जाहीर

मुंबई: सत्ता स्थापन होऊनही बराच काळ मंत्र्यांची खाती निश्चित व्हायला वेळ लागला. अंतर्गत धुसफूस, विशिष्ट खात्यांचा आग्रह यामुळे मंत्र्यांची खाती निश्चित व्हायला वेळ लागला. काल संध्याकाळी मंत्री आणि त्यांची खाती याची यादी राज्यपालांकडे देण्यात आली. राज्यपालांनी उशिरा त्याला मंजुरी दिली आणि घोडं एकदाचं गंगेत न्हालं!
शिवसेनेचे मंत्री आणि त्यांची खाती याप्रमाणं: उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, अजित पवार, उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन, शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, सुभाष देसाईंना मिळालं उद्योग, संजय राठोडांकडे वने, शंकरराव गडाखांना जलसंधारण, अनिल परबांकडे परिवहन, संसदीय कामकाज, उदय सामंतांना उच्च तंत्रशिक्षण, आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन व पर्यावरण, दादा भुसेंना कृषी, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा, संदिपान भुमरे रोजगार हमी, शंभुराजे देसाईंकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण), अब्दुल सत्तारांना महसूल आणि ग्रामविकास (राज्यमंत्री), बच्चू कडूंना जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार (राज्यमंत्री), राजेंद्र यड्रावकर आरोग्य, सांस्कृतिक, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची खाती आणि नावे: अनिल देशमुख गृहमंत्री, छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील असतील राज्य उत्पादन शुल्क, कामगार मंत्री, धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय, नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री, बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार, जितेंद्र आव्हाडांना मिळाले गृहनिर्माण, राजेश टोपे यांच्याकडे असेल आरोग्य, राजेंद्र शिंगणे अन्न व औषध प्रशासन, हसन मुश्रीफ यांयाकडे असेल ग्रामविकास, दत्ता भरणे असतील जलसंधारण, सामान्य प्रशासन (राज्यमंत्री),
अदिती तटकरे यांना उद्योग, पर्यटन, क्रीडा (राज्यमंत्री), उदगीरचे संजय बनसोडे यांना पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम (राज्यमंत्री), प्राजक्त तनपुरे नगरविकास, ऊर्जा, उच्च तंत्रशिक्षण (राज्यमंत्री).
काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असतील ही खाती: बाळासाहेब थोरातांना महसूल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम, नितीन राऊतांना ऊर्जा, वर्षा गायकवाडांकडे शालेय शिक्षण, केसी पाडवी असतील आदिवासी विकास मंत्री, लातुरचे अमित देशमुख यांना मिळाले वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक,
विजय वडेट्टीवार असतील मदत-पुनर्वसन, ओबीसी, खार जमीन मंत्री, यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला बालविकास, अस्लम शेख बंदर विकास, वस्त्रोद्योग आणि मत्स्य संवर्धन, सुनील केदार दुग्धविकास आणि पशुसंवर्धन, सतेज पाटील असतील गृह राज्यमंत्री (शहरे) आणि विश्वजित कदमांना मिळाले कृषी व सहकार (राज्यमंत्री).


Comments

Top