HOME   महत्वाच्या घडामोडी

अमित देशमुख लातुरचे पालकमंत्री, आज पोटनिवडणूक, नागपूर जिल्हा परिषद कॉंग्रेसकडे, खाद्यतेल शंभरीवर, अक्षयकुमारवर शिवप्रेमी संतप्त.....०९ जानेवारी २०२०


अमित देशमुख लातुरचे पालकमंत्री, आज पोटनिवडणूक, नागपूर जिल्हा परिषद कॉंग्रेसकडे, खाद्यतेल शंभरीवर, अक्षयकुमारवर शिवप्रेमी संतप्त.....०९ जानेवारी २०२०

* लातुरच्या प्रभाग ११ अच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, उद्या मनपात मतमोजणी
* प्रभाग ११ अमध्ये कॉंग्रेस, भाजपा आणि वंचितमध्ये लढत
* लातूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष राहूल केंद्रे आज घेणार सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक
* अमित देशमुख यांच्याकडे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री
* पुण्यात अभाविपच्या फलकाला काळे फासणार्‍या राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक
* आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते- शिवसेना
* नागपूर जिल्हा परिषदेत भाजपाला धक्का, ५८ पैकी ३० जागी कॉंग्रेसला विजय
* अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता येणार
* वाशिम जिल्हा परिषदेत कुणालाच बहुमत नाही, महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता
* उस्मानाबाद: बंडखोर तानाजी सावंतांना समजावण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न अयशस्वी
* खाद्यतेलांचे भाव गेले शंभरीच्या पार, तेलाच्या आयातील बंदी असल्याने भारतातील गणित बिघडले
* भारत हा खाद्यतेलाचे सर्वाधिक सेवन करणारा देश
* औरंगाबाद-बेंगलोर विमान सेवा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार
* लोकांची कामे करा, बदल्यांच्या भानगडीत पडून का, प्रलोभनांपासून दूर रहा, शरद पवार यांची मंत्र्यांना सूचना
* निरमाच्या जाहिरातीतील अक्षयकुमारवर शिवप्रेमी संतप्त, शिवरायांचा अवमान झाल्याची तक्रार
* राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र आण्ण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
* शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने शिवसेनेपासून अनेजण दुरावतील- एकनाथ खडसे
* वडेट्टीवारांकडे भूकंप पुनर्वसन खाते, ते भूकंप घडवतील आणि पुनर्वसनही करतील- सुधीर मुनगंटीवार
* यशवंत सिन्हा काढणार गांधी यात्रा, सुधारित नागरिकत्व कायद्यास करणार विरोध
* जेएनयूतील हल्लेखोरांपैकी काहींची ओळख पटली
* कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला काही ठिकाणी मिळाले हिंसक वळण
* केंद्र सरकार दिल्लीत पोलिसांना काम करु देत नाही- केजरीवाल
* ३१ जानेवारीपासून संसदेच्या अथसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात
* दिल्लीचं तापमान १३ अंशापर्यंत घसरलं
* इराणने पुन्हा तीन अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले, ८० जणांचा खात्मा झाल्याचा दावा
* इराणवर आर्थिक निर्बंध आणणार- अमेरिका
* इराणने अमेरिकन तळावर केलेल्या हल्ल्यात जिवित हानी झाली नाही- डोनाल्ड ट्रम्प


Comments

Top