HOME   महत्वाच्या घडामोडी

प्लास्टीक झेंडे जिंदाबाद, नाट्यगृहप्रश्नी न्याय देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन, लातुरच्या तरुणाचा ‘टॅंकर’ चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर, महापौरांना भाजपाची लाखोली.....२६ जानेवारी २०२०


प्लास्टीक झेंडे जिंदाबाद, नाट्यगृहप्रश्नी न्याय देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन, लातुरच्या तरुणाचा ‘टॅंकर’ चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर, महापौरांना भाजपाची लाखोली.....२६ जानेवारी २०२०

* सरकारने हजारदा सांगूनही लातुरात प्लास्टीक झेंड्यांची विक्री, सरळसरळ अवमान
* लातूर येथील ज्येष्ठ नागरिक तथा कापूस व्यापारी हरिकिशन बांगड यांचे अल्पशा आजाराने निधन
* दर्जीबोरगाव येथील जागृत देवस्थान श्री चिन्मयानंद स्वामी मठ येथे सांस्कृतिक सभागृह उभारण्याची खा. सुधाकरराव शृंगारे यांची घोषणा
* लातुरच्या नाट्यगृहाच्या नामांतरप्रश्नी भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांना दिले निवेदन, योग्य ती कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
* आज प्रजासत्ताक दिन, दिल्लीसह देशाच्या महत्वाच्या ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था
* दिल्लीचा संसद परिसर आणि राजपथाला आकर्षक विद्युत रोषणाई
* मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर, मुंबई महापालिकेची इमारतही झळाळली
* मुंबईत शिवाजी पार्कवर होणार पथ संचलन
* जॉर्ज फर्नांडीस, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्म पुरस्कार घोषित
* ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार
* लातुरच्या विश्वज्योत रांजणकर या तरुणाचा ‘टॅंकर’ हा लघुपट अमेझॉन प्राईमने निवडला, ०७ जूनला न्यूयार्कमध्ये प्रदर्शन
* न्या. बी, जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत सीएए विरोधातील तीन दिवसांचे टाऊन हॉल मैदानावरील धरणे आंदोलन समाप्त
* लातुरच्या नव्या नाट्यगृहाला अटलबिहारी वाजपेयी यांचेच नाव द्या, भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांची मनपा कार्यालयासमोर निदर्शने आणि धरणे
* नाट्यगृहाच्या नावाच्या बदलाचा ठराव मागे न घेतल्यास पालकमंत्र्यांचा सत्कार होऊ देणार नाही- शैलेश लाहोटी
* महापौरांना म्हणाले आयत्या बिळात नागोबा, चमको महापौराचा धिक्कार असो, व्हाट्सअ‍ॅप महापौर हाय हाय, लबाड लांडगं ढोंग करतंय, विकास केल्याचं सोंग करतंय!
* वंचित बहुजन आघाडीच्या लातूर बंदला संमिश्र प्रतिसाद, शिरुर ताजबंद आणि अहमदपुरात कडकडीत बंद
* शहराला शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावा- पालकमंत्री अमित देशमुख
* पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून शहीद जवान सुरेश चित्ते कुटुंबियांचे सांत्वन
* २६ जानेवारीला राज्यमंत्री संजय बनसोडे लातूर जिल्हा दौर्‍यावर, उदगीर येथे झेंडावंदन
* लातुरच्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत २६ जानेवारी रोजी एनआरसी विरोधी परिषद


Comments

Top