HOME   लातूर न्यूज

मुरुड शहरातील काँग्रेस मजबूत करणार, लवकरच विस्तार- मोईज शेख


मुरुड शहरातील काँग्रेस मजबूत करणार, लवकरच विस्तार- मोईज शेख

मुरुड: मुरुड शहरातील काँग्रेसचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार मुरुड शहरातील काँग्रेस संघटन मजबूत करणार असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. मुरुड शहर काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक मुरुड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाठ, शंकर गुट्टे, संजय ओव्हळ यांची प्रमुख उपस्थित होती. लोकनेते विलासराव देशमुख, आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, युवा नेते धीरज देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग मुरुड शहरात कार्यरत आहे. गावस्तरावर सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व पुढे आणण्यासाठी व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार मुरुड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी सांगीतले. काँग्रेसचा व्यापक विचार लक्षात घेऊन व काँग्रेसला गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे. आमदार अमित देशमुख व युवा नेते धीरज देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्य कार्यकत्यांनी एक दिलाने पक्षाचा विचार घराघरात पहोचवणे आवश्यक असल्याचे मोईज शेख यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ सदस्य बलभीम पटाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उध्दव सवासे, ई•श्वरप्रसाद चांडक यांनी मनोगत व्यक्त केले.


Comments

Top