लातूर: अलीकडे लातुरच्या लॉजेसमध्ये नको ते प्रकार सर्रास घडत आहेत. आज गांधी चौक पोलिसांनी बसस्थानकासमोरील मधुबन लॉजवर धाड टाकली. ०६ वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणार्या तरुणी आणि त्यांचे सहा मित्र पोलिसांना सापडले. या सर्वांना गांधी चौक ठाण्यात आणून नंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलींच्या पालकांना बोलावून तंबी देऊन सोडून देण्यात आले. त्या सहा तरुणांवर कारवाई केली जात आहे.
लोकनेते विलासराव देशमुख गेल्यापासून लॉजेसचा धंदा ठंडा झाला आहे. लातुरातील बहुतांश लॉजेसमध्ये असे प्रकार चालतात. परवाच एका लॉजवर अशी धाड पडली होती. लॉजमध्ये वास्तव्याला येणार्यांच्या ओळखपत्राची किंवा आधार कार्डाची प्रत ठेवणे बंधनकारक आहे पण असे फारसे कुणी करीत नाही. काही लॉजचालकांना पोलिसांचे आणि राजकीय मंडळींचे अभय आहे हे सर्वश्रुत आहे
Comments