१४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ०५ वाजता प्रसिध्द मधुमेहतज्ञ डॉ. अभिजीत मुगळीकर यांचे व्याख्यान जानाई फंक्शन हॉल, मित्र नगर, खोरी गल्ली लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिल्हा संघचालक सीए संजय अग्रवाल भूषवणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण लातूर जिल्हा समितीच्या वतीने शिवाजी चौक लातूर येथे रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र चालवले जाते. फावलर बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉकर, वॉकर स्टीक्स, या प्रमुख साहित्यासह सर्व रूग्णोपयोगी साहित्य रूग्णांना अल्प भाड्याने उपलब्ध करून दिल्या जातात. लातूर जिल्हा जनकल्याण समितीच्या वतीने सेवावस्तीतील मुलांमुलींसाठी संस्कार वर्ग, रूग्णांसाठी रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र चालवले जाते. सेवावस्तीतील वयात येणार्या मुलींसाठी किशोरी विकास वर्ग व अभ्यासिका, ग्रामिण भागातील शाळे साठी फिरती प्रयोगशाळा हे प्रकल्प जनकल्याण जिल्हा समितीच्या वतीने लवकरच चालू केले जाणार आहेत. जागतिक मधुमेहदिनी डॉ. अभिजीत मुगळीकर यांच्या मधुमेहावरील व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रा.स्व.संघ जनकल्याण समिती लातूर जिल्हा अध्यक्ष अतुल ठोंबरे, आशोक शिवणे, विजय गोढाळकर, डॉ. स्मिता फडणीस, प्रकल्प प्रमुख डॉ. व्यंकटेश जोशी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश फडकुले, संगम बरूरे, प्रकाश रेड्डी प्रयत्न करीत आहेत.
Comments