लातूर: महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक १० डिसेंबर रोजी होणार आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आतापासूनच खबरदारी घेणे आअवश्यक असल्याने ही चर्चा आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांना प्रत्यक्ष किंवा इमेलद्वारेही सूचना करता येईल यासोबतच प्रत्येक पाण्याच्या टाकीनिहाय वितरण व्य्वस्थेतील त्रुटी शोधणे, अमृत योजनेचे काम पूर्ण करणे, पाणी पुरवठ्यातील गळती रोखणे, शहरातील बोअरवेल्सबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, अनधिकत नळजोडण्यांवर कारवाई करणे, व्यावसायिक कनेक्शनचा फेर आढावा घेणे, पाणीपट्टी वसुली वाढवणे आणि पाणी पुरवठा यांत्रिकी विभागातील नूतनीकरण आणि दुरुस्ती करणे अशीही कामे केली जाणार आहेत अशी माहिती आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
Comments