लातूर: महाराष्ट्रात मराठा समाजास नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वातील ओबीसींवर होणाऱ्या परिणामा संदर्भात चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी लातूर येथे जिल्हास्तरीय ओबीसी जागर बैठकीचे आयोजन १० डिसेंबर, सोमवार रोजी दुपारी ०४ वाजता अष्टविनायक हॉल, अष्टविनायक, मंदिर परिसर, लातूर येथे करण्यात आले आहे.
मराठा समाजास देण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणा मधील त्रुटी व मेगा भरती मध्ये होणारा दुजाभाव तसेच अस्तित्वातील ओबीसींवर होणारे दूरगामी परिणाम यामुळे लातूर मधील विविध १६ ओबीसी संघटनांनी एकत्र येत ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी महाराष्ट्र ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना केली आहे. काही दिवसांपूर्वी या समितीने पत्रकार परिषद घेऊन ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. या चळवळीस जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत विविध पक्ष, सामाजिक संघटना, पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस जास्तीत जास्त ओबीसी बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments