HOME   लातूर न्यूज

रमेशभाई ओझा यांच्या भागवत कथेची जय्यत तयारी

१२ हजार भाविक बसू शकतील अशा भव्य मंडपाची उभारणी


रमेशभाई ओझा यांच्या भागवत कथेची जय्यत तयारी

लातूर: राष्ट्रसंत रमेशभाई ओझा यांच्या श्रीमद भागवत कथेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. गावभागातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरच्या प्रांगणातील वृंदावन धाम येथे १४ ते २१ डिसेंबर या कालावधीत दुपारी ०३ ते सायंकाळी ०७ पर्यंत ही कथा चालणार आहे. श्रीमद भागवत कथेसाठी १२ हजार भाविक बसतील असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. कथेसाठीचा मंच 30 x 50 व संगीतकारांसाठी 25 x 15 साईजचा मंच उभारण्यात आला आहे. कथा स्थळाला वृंदावन धाम असे नाव देण्यात आले आहे. मंडपामध्ये 6 x 8 साईजच्या दोन स्क्रीन लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व भाविकांना चांगल्या प्रकारे या कथेचा लाभ घेता येणार आहे. शुक्रवार १४ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी ०१.३१ वाजता श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ते कथा स्थळापर्यात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रसंत रमेशभाई ओझा यांच्या श्रीमद भागवत कथेला प्रारंभ होईल. या कथेचे मदनगोपाल द्वारकादास मालू, हरिकिशन लक्ष्मीरमण मालू व समस्त मालू परिवार यजमान आहेत. लातूर जिल्हा माहेश्वरी सभा, जिल्हा माहेश्वरी महिला संगठन, जिल्हा माहेश्वरी युवा संघटन, शहर माहेश्वरी सभा, बार्शी रोड माहेश्वरी मंडळ, गावभाग माहेश्वरी समाज, राजस्थानी महिला मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, अपनी राधाकृष्ण गोशाळा, माहेश्वरी युगल्स, राजस्थानी रॉयल्स, रामेदवबाबा भजनी मंडळ, राजस्थानी सत्संग मंडळ, गुरू गणेश जीवराज जैन गोरक्षण, भारतीय जैन संघटना, माय क्लब, सत्संग प्रतिष्ठान, आशादीप परिवार, दीपस्तंभ परिवार, अग्रवाल युवा संघटन, राजस्थानी विप्र मंडळ, लातूर समस्त जैन संघटन, आदी संस्थांचे पदाधिकारी या कथेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या श्रीमद भागवत कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यजमान मदनगोपाल मालू, हरिकिशन मालू व समस्त मालू परिवाराने केले आहे.


Comments

Top