HOME   लातूर न्यूज

विलास कारखान्यास ऊत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

प्रतिकूल परिस्थितील यशस्वी वाटचालीचे मान्यवरांनी केले कौतुक


विलास कारखान्यास ऊत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

लातूर: साखर उदयोगासाठी मार्गदर्शन आणि संशोधन करणारी शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, यांनी गळीत हंगाम १७-१८ मधील कामगिरीसाठी मानाचा ऊत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विलास सहकारी साखर कारखान्यास प्रदान केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थापक चेअरमन आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वा खाली कारखाना यशस्वी वाटचालीचे कौतुक केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे येथे ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हापुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख, व्हा.गोविंद बोराडे, प्रभारी कार्यकारी संचालक एस.व्ही. बारबोले व सर्व संचालक मंडळाने स्विकारला. यावेळी व्यासपीठावर माजी केद्रिंय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार अजित पवार, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, आमदार बबनराव शिंदे, सतेज पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, रोहित पवार, संभाजी कडू पाटील, इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याच्या वतीने पुरस्कार स्विकारताना संचालक नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, रविद्र काळे, चंद्रकांत टेकाळे, वलायतखा पठाण, जयचंद भिसे, गोवर्धन मोरे, नितीन पाटील, बालाजी सांळूके, जगदिश चोरमले, भारत आदमाने उपस्थित होते.


Comments

Top