HOME   लातूर न्यूज

वीर योध्दा संघटनेचे आमरण उपोषण मागे

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरुंच्या स्मारकाचा फलक लावणार


वीर योध्दा संघटनेचे आमरण उपोषण मागे

लातूर: नाना नानीपार्क येथे शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. स्मारकाच्या नियिजित जागी येत्या १५ दिवसात फलक रोवला जाईल असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले. उप महापौर देवीदास काळे यांनी पुढाकार घेत उपोषण सोडवले. शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचे स्मारक नाना नानी पार्क येथे उभारण्यात यासाठीवीर योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजणकर, शशी पंकज मधुकर, नितीन मोहनाळे, राज धनगर, श्रीकृष्ण पांडे, प्रशांत शिंदे यांनी उपोषण सुरु केले होते. हे उपोषण सोडवण्यासाठी ‘लोकलढा’चे अध्यक्ष प्राचार्य मधुकर मुंडे यांचीही मध्यस्थी कामी आली.


Comments

Top