लातूर: जिल्हयात माहे जुलै ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यामध्ये रेणापूर तालुक्यात पुरामुळे शेतजमीन वाहुन गेल्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाकडून याची नुकसान भरपाई मिळाली आहे. पण रेणापूर तालुक्यातील चांडगावसह काही गावातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली नाही. अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे अनुदान यादीत घेवून शासकिय अनुदान त्यांना द्या याबाबत जिल्हाधिकारी, लातूर व तहसिलदार रेणापूर यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देवून मागणी केली आहे. रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथील बाधित शेतकरी यांची शेती नदी लगत आहे. अतिवृष्टीमूळे नदिचे पाणी पात्राबाहेर २५० मीटर पर्यंत गेले व त्यामुळे शेतातील उभे पिक वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहाने माती वाहून जाऊन खड्डे पडले होते. या बाधित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करून शासकिय अनुदान त्यांना मिळणे आवश्यक आहे. याकरीता निवेदन देवून काँग्रेस पक्षाच्या वतीने अनुदान मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर लातूर ग्रामीण सेवा दल अध्यक्ष अनील पवार, केशव माने, तानाजी कणसे, प्रमोद कापसे, ओम माने, सुरेश शिंदे, अनिल माने, महादेव कांबळे, इंद्रजित शिंदे आदीच्या स्वाक्षरी आहेत.
Comments