HOME   लातूर न्यूज

सीएम चषक स्पर्धेचे रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते बक्षीस वितरण

स्व. अटल बिहारी वाजपेयींना जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन


सीएम चषक स्पर्धेचे रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते बक्षीस वितरण

लातूर: सीएम चषक अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा स्तरावर पार पडलेल्या क्रिकेट, कुस्ती, कब्बडी, हॉलीबॉल व कॅरम या क्रिडा स्पर्धांचे बक्षीस वितरण भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते मंगळवारी लातूर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील खुल्या व शालेय गटातील खेळाडूंना रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमीत्त रमेशअप्पा कराड यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. लातूर ग्रामीण मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले.
सीएम चषक स्पर्धेतंर्गत लातूर ग्रामीण मतदार संघात घेण्यात आलेल्या क्रीडाडा व इतर स्पर्धांमध्ये क्रिकेट स्पर्धेत खुल्या गटात रेणुका क्रिकेट क्लब, रेणापूर – प्रथम, टायगर ग्रुप, भातांगळी – व्दितीय व रुई क्रिकेट क्लब, रुई संघाने तृतीय क्रमांक तर शालेय गटात क्रिकेट स्पर्धेमध्ये श्रीराम विद्यालय, रेणापूर – प्रथम व शारदा विद्यालय, वांगदरी या संघाने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. पासिंग हॉलीबॉल स्पर्धेमध्ये खुल्या गटात हारीनायक तांडा-पोहरेगाव तांडा संघ – प्रथम, सेवा क्लब, डिघोळ तांडा संघ – व्दितीय, किंग्ज 8, लातूर संघ – तृतीय आला असून शुटिंग हॉलीबॉल स्पर्धेत भाजपा लातूर ग्रामीण, लातूर तालुका – प्रथम, राजे ग्रुप, भेटा – व्दितीय, बस्व मित्र मंडळ, येल्लोर या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर शालेय पासिंग हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जनता विद्यालय, पोहरेगाव – प्रथम, यु मुम्बा, पोहरेगाव – व्दितीय व आनंद गुरुकुल पोहरेगाव तांडा या संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
कब्बडी स्पर्धेत पुरुष खुल्या गटात जय हनुमान क्रिडा मंडळ, रेणापूर – प्रथम, बजरंग सेना कब्बडी संघ, वाघोली – व्दितीय, बजरंग क्रांती संघ, हणमंतवाडी तांडा संघ – तृतीय तर कब्बडी स्पर्धेत महिला खुल्या गटात श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय, रेणापूर – प्रथम, समता विद्यालय, जोडजवळा संघाने व्दितीय क्रमाक पटकावला आहे. कब्बडी स्पर्धेत मुलांच्या शालेय गटात श्रीराम विद्यालय, रेणापूर – प्रथम क्रमांक व भगतसिंग विद्यालय, वाघोली संघ व्दितीय आला असून मुलींच्या शालेय गटात श्रीराम विद्यालय, रेणापूर – प्रथम व भगतसिंग विद्यालय, वाघोली संघाने व्दितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच 14 वर्ष वयोगटातील शालेय गटात श्रीराम विद्यालय – प्रथम तर जिल्हा परिषद प्राशाला, वाला हा संघ व्दितीय आला आहे.
कुस्ती स्पर्धेत पुरुष ३५ किलो वजनी गटात, सुरज काळे, बोरगावकाळे – प्रथम, देवराज दुधाळे, रायवाडी – व्दितीय, ४० किलो गटात रणवीर भक्ते, रामेश्वर – प्रथम, महेश सावंत, वाकडी – व्दितीय, ४५ किलो गट ऋषीकेश घोडके, रुई – प्रथम, आदित्य यादव, दिंडेगाव – व्दितीय, ५० किलो गट निखील पवार, साई – प्रथम, अशोक पतंगे, वांगदरी – व्दितीय, ५५ किलो गट सचिन लवटे, कारसा – प्रथम, सचिन भावले, रुई – व्दितीय, 58 किलो गट सागर शिंदे, रामेश्वर – प्रथम, संभु रोकडे, कारसा – व्दितीय, 65 किलो गट गणेश लोमटे, दिंडेगाव – प्रथम, विजयकुमार ठोंबरे, रामेश्वर – व्दितीय, ७४ किलो गट मनोहर कराड, रामेश्वर – प्रथम, अमोल पांचाळ, तांदुळजा – व्दितीय, ८६ किलो गटात प्रदिप काळे, बोरगावकाळे – प्रथम, योगिराज नागरगोजे, दवणगाव – व्दितीय, ८६ किलो वरील गटात प्रसाद शिंदे, सावरगाव – प्रथम व सुरज हालुंगडे, रामेश्वर व्दितीय क्रमांक पटकावला आहे. तर कुस्ती स्पर्धेत महिला गटात ४८ किलो गटात मोहिनी ढोक, समदर्गा – प्रथम, रेश्मा सोनवणे, रुई – व्दितीय, ५५ किलो गटात आहुती जाधवर, रामेश्वर – प्रथम, जयश्री झुंजारे, रुई – व्दितीय, ६५ किलो गटात प्रियंका लहाडे, रुई – प्रथम, अश्विनी जाधवर, रामेश्वर – व्दितीय, ७५ किलो गटात वैष्णवी लोमटे, जोडजवळा – प्रथम व ऋतुजा लोमटे, जोडजवळा हिने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
कॅरम स्पर्धेत खुल्या गटात बाळू काकासाहेब जटाळ, भातांगळी – प्रथम, राम गणपती शिंदे, भातांगळी – व्दितीय व अजित बालाजी दुटाळ, चिंचोली बल्लाळनाथ – तृतीय तर शालेय गटात ओमकार अंकुश मातोळे, पोहरेगाव – प्रथम, प्रकाश दत्ता सुरवसे, पोहरेगाव – व्दितीय व पंकज अशोक गायकवाड, पोहरेगाव यांने तृतीय क्रमांक मिळवला आहे. रांगोळी स्पर्धेत सांघीक खुल्या गटात प्रतिक्षा कोतवाड, प्राजक्ता कोतवाड, पुजा करडिले – प्रथम, नम्रता कुलकर्णी, तनुजा गिरी – व्दितीय व स्वाती सुरवसे, पायल चेवले – तृतीय तर शालेय वैयक्तीक रांगोळी स्पर्धेत प्रिती जाधव – प्रथम, निकीता पवार – व्दितीय व मानसी रवळे हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच प्रबोधन स्पर्धेत वैयक्तीक गटात स्नेहा फोलाने – प्रथम, भाग्यश्री गायकवाड – व्दितीय व प्रियंका विरुळे ने तृतीय क्रमांक मिळवला आहे. यावेळी विविध क्रिडा प्रकारात प्राविण्य मिळविलेल्या सर्व खेळाडूंना भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत मद्दे यांनी करुन शेवटी आभार मानले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूर तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे, रेणापूर पंसचे सभापती अनिल भिसे, उप सभापती अनंत चव्हाण, संगायोचे लातूर तालुकाध्यक्ष साहेबराव मुळे, संगायोचे रेणापूर तालुकाध्यक्ष श्रीकिसन जाधव, सीएम चषकचे संयोजक चंद्रसेन रेड्डी, अभिजीत मद्दे, गोविंद नरहरे, डॉ. बाबासाहेब घुले, विशाल शिंगडे, शामसुंदर वाघमारे, वसंत करमुडे, लक्ष्मण खलंग्रे, राजकिरण साठे, पद्माकर चिंचोलकर, श्रीकृष्ण मोटेगावकर, संजय डोंगरे, श्रीकृष्ण पवार, विस्तारक दिलीप पाटील, नरसिंग येलगटे, जलिल शेख, भाऊसाहेब गुळभिले, दत्ता सरवदे, उज्ज्वल कांबळे, विजय चव्हाण, अभिजित कणसे, खंडू कुंभार, बालाजी दुटाळ, सुधाकर कराड, गणेश जाधव यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, विविध खेळाडू, क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Comments

Top