HOME   लातूर न्यूज

‘विसावा’ची जागा आता न्यायालयाकडे सुपूर्त

जुन्या न्यायालयासमोरच विस्तारीत न्यायालय उभे राहणार


‘विसावा’ची जागा आता न्यायालयाकडे सुपूर्त

लातूर: शहराच्या अशोक हॉटेल चौकातील जुन्या विसावा विश्रामगृहाच्या जागेचा ताबा रितसर ताबा पावतीसह लातुरच्या न्यायालयाकडे सुपूर्त करण्यात आला. ही पावती मुख्य न्याधिशांकडे देण्यत आली. विश्रामगृहाची जागा आठवडाअभ्रात लातुरच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. लातूर जिल्ह्याच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या उपस्थितीत या जागेचा ताबा लातूर न्यायालयाकडे देण्यात आला. वकील मंडळींनी पेढे वाटप करुन आनंद साजरा केला. यावेळी जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आरवाय शेख, उपाध्यक्षा सुनंदा इंगळे, कैलास अनसरवाडेकर, शिशंकर भुजबळ, रवी पिचारे, हर्षदा जोशी, श्रीकांत मोमले मिलिंद दंडे, प्रमोद शिंदे, बशीर शेख, चंद्रकांच चोपडे, प्रदीप पाटील, अजय कलशेट्टी, श्रीनिवास मातोळकर आदी वकील मंडळाचे सदस्य उपस्थित होते. विश्रामगृहाची ही जागा न्यायालयास द्यावी म्हणून वकील मंडळी अनेक वर्षांपासून न्यायालयात संघर्ष करीत होती.


Comments

Top