HOME   लातूर न्यूज

सचिन मस्के, पुनित पाटील यांना कारणे दाखवा नोटीस

खंडणी प्रकरणाचा निषेध, म्हणून कॉंग्रेसने केली कारवाई- मोईज शेख


सचिन मस्के, पुनित पाटील यांना कारणे दाखवा नोटीस

लातूर: वृत्तपत्र व इतर माध्यमातून नगरसेवक सचिन मस्के आणि पुनित पाटील यांच्या संदर्भाने प्रसिध्द झालेले वृत्त अत्यंत धक्कादायक, त्रासदायक आणि तेवढेच अविश्वसनीय आहे. या प्रकाराचा काँग्रेस पक्ष निषेध करीत असून या दोघांनाही पक्षाकडून तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी म्हटले आहे. शहर काँग्रेसच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात मोईज शेख यांनी म्हटले आहे. लातूरचे नागरीक शांतताप्रिय आहेत त्यातूनच हे शहर प्रगतीपथावर जात आहे. शहराचे हे वेगळेपण जपण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि येथील नेतृत्वाने सदैव प्रयत्न केले आहेत. जनतेला त्रास होईल आणि येथील प्रगतीला बाधा येईल अशा प्रवृत्तीला काँग्रेसने कधीही थारा दिलेला नाही. भविष्यातही तो दिला जाणार नाही. सचिन मस्के आणि पूनित पाटील यांचे प्रकरण पोलिसांत दाखल आहे. तपासाअंती सत्य बाहेर येणारच आहे याशिवाय पक्षाने दोघांनाही कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्याकडूनही खुलासा मागवला आहे. त्याआधारे पक्षाच्या वतीने आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही मोईज शेख यांनी म्हटले आहे.


Comments

Top