HOME   लातूर न्यूज

खताच्या स्वरुपात कचर्‍याची घरवापसी!

प्रभाग १८ मध्ये हिरवाई बहरण्याची अपेक्षा, नगरसेवक कव्हेकरांचा उपक्रम


खताच्या स्वरुपात कचर्‍याची घरवापसी!

लातूर: प्रभाग क्रमांक १८ चे युवा नगरसेवक अजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून प्रभागातील कचर्‍यावर प्रक्रिया करून खत तयार करण्यात आले. हेच खत ०३ हजार विद्यार्थ्याना मोफत वाटप करण्यात आले असून या खतापासून वनराई बहरण्यास मदत होणार आहे. एका अर्थाने नागरिकांच्या घरातून जमा केलेला हा कचरा रूप बदलून पुन्हा त्यांच्या घरी जात आहे. कचर्‍याची ही घरवापसी कौतुकाचा विषय ठरली आहे.
शहरातील कचर्‍याची समस्या गंभीर बनली असताना नगरसेवक अजित पाटील यांनी प्रभागातील कचर्‍याचे संकलन सुरू केले. संकलन करतानाच ओला आणि सुका असे त्याचे वर्गीकरण केले. यातील ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खात तयार करण्यात आले आहे. या खताचे वाटप विद्यार्थ्याना करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अजित पाटील तर पाहुण्या म्हणून महापालिकेच्या उपायुक्त वसुधा फड, मिनार उर्दू शाळेचे सचिव अब्दुल रज्जाक अत्तरवाले, नगरसेविका भाग्यश्री शेळके, सौ सरिता राजगिरे, मुख्याध्यापक अहमद, प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक संजय बिरादार, कोरे दादा, सुलगुडले अप्पा, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, झोनल स्वच्छता निरीक्षक आक्रम शेख आदींची उपस्थितीने होती .
कार्यक्रमाच्या प्रारंभी कचर्‍यापासून खत निर्मिती कशी होते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याना दाखविण्यात आले. यावेळी बोलताना उपायुक्त वसुधा फड म्हणाल्या की, खत निर्मिती प्रकल्प हा अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे . विशेष म्हणजे यातून निर्माण होणारा खत हा पर्यावरण पूरक आहे .असेच उपक्रम सर्व नगरसेवकांनी राबवले तर कचर्‍याची समस्याच समूळ नष्ट होण्यास मदत होणार आहे. नगरसेवक अजित पाटील म्हणाले की, प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या घरातून जमा केलेल्या कचर्‍यापासून हा खत तयार करण्यात आला असून याचे आता मोफत वितरण करण्यात येत आहे. हे खत झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. कचरा ही आपत्ती नसून संपत्ती आहे. ही बाब आता खरी ठरत असून नागरिकांच्या ती लक्षात आली आहे, नागरिकांना अभिमान वाटावा असे हे कार्य असल्याचेही त्यांनी सांगितले .
महाराष्ट्र विद्यालय, छत्रपती शिवाजी नॅशलन इंग्लिश स्कुल, संत पाचलेगावकर विद्यालय, मिनार उर्दू शाळा, राजर्षी शाहू शाळेमधील ०३ हजार विद्यार्थ्याना या प्रत्येकी एक किलो पॅकिंग खताचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.


Comments

Top