लातूर: हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने लातूरात ०६ जानेवारी रोजी हिंदू राष्ट्रजागृती सभा आयोजीत करण्यात आलेली आहे. या सभेत लातूर शहर आणि जिल्ह्यातील हिंदूत्ववादी नागरीकांनी उपस्थित रहावे असे अवाहन हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत केले.
येथील पारिजात मंगल कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेस बोलताना त्यांनी सांगीतले की, सध्या हज यात्रा, चर्च, मदरसे यांना आर्थीक सहाय्य मिळत आहे. अहिंदूना अल्पसंख्यांक म्हणून सुविधा दिल्या जात आहेत. पण बहुसंख्य असणार्या हिंदूंना काहीच मिळत नाही. हिंदूंच्या मंदिरावरील आक्रमण, यात्रांवरील कर, गोमातेची हत्या, हिंदूंचे धर्मांतरण, कश्मिरी पंडीतांचे पुनर्वसन हे प्रश्न सोडवले जात नाहीत. हिंदू जनजागृती समिती मागील १५ वर्षांपासून यासाठी काम करीत आहे. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या संदर्भात समितीच्यावतीने देशभर हजारो सभांचे आयोजन केले जात आहे. लातूर येथे ०६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राजस्थान विद्यालयाच्या पाठीमागील मैदानावर हिंदू राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस पुणे येथील मिलींद धर्माधिकारी, भागवताचार्य पद्मनाभ व्यास महाराज, अधिवक्ता निलेश सांगोलकर मार्गदर्शन करणार आहेत. या सभेस लातूर शहर आणि जिल्ह्यातील हिंदूत्ववादी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहनही यावेळी करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस अधिवक्ता पुरुषोत्तम नावंदर, सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी, हिंदू जनजागृती समितीचे विक्रम घोडके, वर्षा कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, अरुणा कुलकर्णी, उल्का जठार, दिपाली मतकर, सुवर्णा मिरजकर यांची उपस्थिती होती.
Comments