लातूर: भाजपाने आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून देशात आणि राज्यात जोरदार तयारी चालू केली आहे. याचाच भाग म्हणून भाजपाध्यक्ष अमित शहा हे ०६ जानेवारीला लातूर येथे येत आहेत. राज्यात आणि देशात राजकीय वातावरण हे बरेच गरम झाले आहे यामुळे कॉंग्रेसने राज्यात जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचा दौरा केला आहे. अमित शहा राज्याच्या दौर्यावर येत असून या कार्यकर्ता संपर्क आणि संघटनात्मक रचना मेळाव्याची सुरुवात लातूर शहरातून होते आहे. उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि लातूर येथील ५ हजार कार्यकर्ते यावेळी उपस्तिथ राहणार आहेत अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच सोबत लातूर शहरातील वाढत चाललेली गुन्हेगारी याबाबतीत दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. यावेळी महापौर सुरेश पवार, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, मिलींद लातूरे, शैलेश लाहोटी, प्रविण कस्तूरे, गुरुनाथ मगे उपस्थित होते.
Comments