लातूर: अमेरिकेत संगणक अभियंता (सॉफ्टवेअर इंजिनिअर) म्हणून कार्यरत असलेले लातूरचे सुपूत्र एखरार जब्बार सगरे यांच्या परदेशातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमेरिकेतील कॅलीफोर्निया या राज्यातील सॅन्डहोजे या शहरात एका नामांकीत कंपनीत एखरार सगरे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. मी लातूरचा असल्याने तेथे लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आदराने उल्लेख केला जातो व मांजरा परिवाराबद्दलही अमेरिकेत मोठे आकर्षण आहे, अशी माहिती यावेळी सगरे यांनी दिली. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी एखरार सगरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी लातूर ग्रामीणचे आ. त्र्यंबक भिसे, जब्बार सगरे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील सेलूकर, जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक एसआर देशमुख, संभाजी सूळ, व्हा. चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल, शिक्षण संस्थाचालक संघाचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चॉंदपाशा इनामदार, संभाजी पाचभाई आदी उपस्थित होते.
Comments