HOME   लातूर न्यूज

लातूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार

खासदारांच्या मागणी पत्रावरच दिले सुरेश प्रभूंनी आदेश


लातूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार

लातूर: शहरासह जिल्ह्याच्या होत असलेल्या विकासामुळे लातूरलाही विमासेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दिले. या मागणीची तत्काळ दखल घेत प्रभू यांनी डॉ. गायकवाड यांच्याच पत्रावर लातूरला विमानसेवा सुरू करण्याचा आदेशच काढला आहे. यामुळे लवकरच लातूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.
लातूर हे व्यापारी केंद्र म्हणून मराठवाड्यासह शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यात प्रसिध्द आहे. येथून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लवकर पोहोचता यावे, यासाठी लातूरहून विमानसेवा सुरू होण्याची नितांत गरज आहे. तशी मागणीही या भागातील नागरिक डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडे वारंवार करीत होते. यामुळे डॉ. सुनील गायकवाड यांनी दिल्ली येथे नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. लातूरला विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी प्रभू यांना दिले. डॉ. सुनील गायकवाड यांच्या मागणीच्या निवेदनावरच सुरेश प्रभू यांनी लातूरला विमानसेवा सुरू करण्याचा आदेश संबधित विभागला दिला आहे. लातूर विमानतळाचा शासनाच्या उड्डाण योजनेत समावेश करून तेथून तत्काळ विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना प्रभू यांनी अधिकार्‍यांना केल्याने लातूरला विमानसेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


Comments

Top