HOME   लातूर न्यूज

मित्राच्या शेतात जाताय? मग फळझाड घेऊन जा !

वसुंधरा प्रतिष्ठानचा वेळा अमावस्या निमित्त आवाहनात्मक उपक्रम


मित्राच्या शेतात जाताय? मग फळझाड घेऊन जा !

लातूर : वेळामावस्या निमित्त आपल्या मित्राच्या शेतात जायचे नियोजन करत असताल तर जाताना फळझाड घेऊन जाऊन शेतात झाडाची लागवड करून पर्यावरण संवर्धन करावे असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
वेळामावस्या सणानिमित्त शेत शिवार फुलतात. अनेकजण आपल्या मित्राच्या शेतात वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी शहर सोडून गावाकडे जातात. यंदा वेळामावस्या अनोख्या पद्धतीने साजरी करावी यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना जनजागृती करून आवाहन केले जाते आहे. मित्राच्या शेतात जाताना फळझाड घेऊन जावे आणि ते झाड शेतात लावावे असे आवाहन केले जात आहे. वेळामावस्या निमित्त हा उपक्रम हाती घेतल्यास मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धन होण्यास मदत होणार असून, फळझाडे लावल्याने शेतकरी बांधवाना देखील आर्थिक मदत होणार आहे.
लातूर शहर भागातून मोठ्या प्रमाणात लोक शेतात जातात. जाताना एक वृक्ष सोबत घेऊन गेल्यास वनभोजनासोबत वृक्षारोपण केल्यास पर्यावरण संवर्धन होण्यास मोठी मदत होणार आहे. मित्राच्या शेतात जाताना एक फळझाड घेऊन जावे असे आवाहन वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top