HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्र्यांचा पाच आणि सहा तारखेला संभाव्य दौरा

सर्व कार्यालयांच्या प्रमुखांनी आपापल्या कार्यालयात हजर रहावे- जिल्हाधिकारी


मुख्यमंत्र्यांचा पाच आणि सहा तारखेला संभाव्य दौरा

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाव्य लातूर जिल्हा दौरा नियोजीत असून ०५ व ०६ जानेवारी रोजी सर्व शासकीय विभाग प्रमुख व तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच सर्व संबंधीत विभागांनी परस्परांत योग्य समन्वय ठेवून मुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री महोदयांच्या संभाव्य दौऱ्यानिमित्त पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक संजय ढगे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जनार्धन विधाते, तहसिलदार अविनाश कांबळे, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रोहन माधव, महापालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे, उत्पादन शुल्क अधिक्षक बरगजे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे यांच्यासह इतर यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृह स्वच्छता व इतर सुविधा तर लातूर महापालिकेचे विमानतळ ते शासकीय विश्रामगृह, थोरमोटे लाँन्स व दयानंद सभागृह मार्गाची स्वच्छता व दुरुस्ती तसेच सार्वजनिक पथदिवे आदींची चोख व्यवस्था ठेवावी. त्याप्रमाणेच पोलीस, अन्न व औषध, आरोग्य व पोलिस विभागाने दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.
०५ जानेवारी रोजी स्थानिक सुटी व 6 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी येत असल्या तरी सर्व शासकीय यंत्रणा प्रमुख व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित रहावे, तसेच राज्य शासनाच्या सर्व फ्लॅगशीप योजनांची अद्ययावत माहिती तयार ठेवावी. जे अधिकारी सुटीवर गेले असतील त्यांना त्यांच्या रजा रद्द झाल्याचे सांगून मुख्यालयी उपस्थित रहाण्याचे विभागप्रमुखांनी कळवावे, असे ही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाणे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या संभाव्य दौऱ्यानिमित्त उपस्थित विभागांना मार्गदर्शन करुन त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या.


Comments

Top