HOME   लातूर न्यूज

ऑनलाईन औषध विक्री: केमिस्ट संघटनेचा हल्लाबोल

आंदोलनास प्रतिसाद, नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणामांची शक्यता


ऑनलाईन औषध विक्री: केमिस्ट संघटनेचा हल्लाबोल

लातूर: ऑनलाईन औषध विक्रीधोरणाच्या विरोधात देशभरातील औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्हा केमिस्टस अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषधी प्रशासनास दिले .
केंद्र सरकारने आणलेल्या ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भातील अध्यादेशाने औषधी विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकादृष्टीने हा विषय लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. केंद्राच्या या ऑनलाईन औषध विक्री धोरणाला यापूर्वीच चेन्नई व दिल्ली उच्च न्यायालयाने आपला विरोध दर्शवला असून ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही याकडे केंद्र सरकार गांभीर्याने पाहत नाही. याच मागणीसाठी देशभरातील औषधी विक्रेत्यांनीही सातत्याने मोर्चा, आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. मात्र, अद्यापही केंद्र सरकार याकडे गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी लातूर जिल्ह्यातील औषधी
विक्रेत्यांनी हल्लाबोल आंदोलन केले. औषधी विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना संघटनेच्या वतीने आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त योगेंद्र पौळ, सचिन बुगड यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बोधकुमार चापसी, जिल्हा सचिव रामदास भोसले, अरुण सोमाणी, ईश्वर बाहेती, नागेश स्वामी, अंकुश भोसले, प्रकाश रेड्डी, मनोज आगसे, अतुल कोटलवार, उमाकांत पाटील, विजय बेल्लाळे, महेश दरक, नितीन भराडिया, सागर मंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Comments

Top