लातूर: लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमासाठी आलेले शिक्षण मंञ्यांची मुलाखत घेत असताना वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांना पोलीस प्रशासन व सत्ताधारी प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करत त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली. हा प्रकार निंदनीय असून आपण या घटनेचा निषेध करत असल्याचे धीरज देशमुख यांनी म्हटले आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मानणार्या आपल्या देशात पत्रकारांवरती हल्ले होत असल्याने याबाबतीत कायदा करावा अशी मागणी माध्यमांचे प्रतिनिधी करत आहेत.अशातच लातुरात पत्रकार बांधवांना पोलीस प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून गैरवर्तणूक होणे ही बाब निश्चितच चुकीची आहे. या घटनेचा सर्वच पत्रकार निषेध करत असून पत्रकार बांधवांच्या भावना लक्षात घेऊन या बाबतीत संबंधितांनी कार्यवाही करून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे आवाहन देखील जिल्हा परिषद सदस्य धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.
Comments