लातूर: पर्यावरणात झपाट्याने बदल होत आहेत. या महत्वाच्या विषयावर मंथन करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायतराज संस्था, हैदराबादच्या वतीने औसा तालुक्यातील लोदगा येथे तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २५ ते २७ जानेवारी दरम्यान ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यासंदर्भात माहिती देताना पाशा पटेल म्हणाले की, ही संस्था वातावरण बदलावर काम करीत आहे. हवामानातील बदलाने मानवासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मानवजातीचा विनाश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कार्यशाळेत विचारमंथन करून चर्चा केली जाणार आहे. यासाठी देशातील या संदर्भात काम करणाऱ्या २०० सेवाभावी संस्थाच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे. त्यापैकी १५० प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पंचायतराज संस्थेचे सचिव डब्लू आर रेडडी यांची या कार्यशाळेस उपस्थिती राहणार आहे. लातूर परिसरातील प्रतिनिधींनीही यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन पटेल यांनी केले आहे.
Comments