HOME   लातूर न्यूज

किल्लारीत राष्ट्रवादीची परिवर्तन निर्धार सभा

अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळांची उपस्थिती


किल्लारीत राष्ट्रवादीची परिवर्तन निर्धार सभा

लातूर: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काढलेली परिवर्थ्न संकल्प निर्धार सभा २४ जानेवारी रोजी किल्लारी येथे येत असून, सायंकाळी पाच वाजता सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही माहिती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. सरकारने मागील चार वर्षाच्या काळात देशातील नागरिकांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल केली आहे. हे सरकार उलथवून टाकण्यासाठी परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशीही माहिती पाटील यांनी दिली.
या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. किल्लारी कारखान्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस उभा आहे. सरकारने त्याकडे लक्ष न दिल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विद्यमान सरकार कुणाच्याही कामी आले नाही असाही आरोप त्यांनी केला. यावेळी बाबासाहेब पाटील, अफसर शेख, मकरंद सावे, सुभाष पवार, योगीराज पाटील, बबन भोसले, श्रीकांत सूर्यवंशी नगराध्यक्ष जावेद शेख उपस्थित होते.


Comments

Top