लातूर: राज्यात दुष्काळ पडला पाहणी नाही, पिके पाण्याअभावी करपली पंचनामा नाही, शेतमालाला हमीभाव नाही, कर्जमाफी नाही अन् फक्त आश्वासने मात्र द्यायचे सत्ताधारी थांबत नाहीत. यारून लक्षात येते की शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत, बेरोजगार तरुणांना काम नाही, आगामी काळात सामान्य माणसाच्या हितासाठी राज्यातील अन देशातील सरकार बदलल्या शिवाय विकास होणार नाही त्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.
महापूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापुरचे सरपंच शिवाजीराव बनसोडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समिती सभापती ललितभाई शहा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडू साहेब पडिले, बाजार समिती उपसभापती मनोज पाटील, विलास कारखाना व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, पंचायत समिती उपसभापती दत्ता शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सोनाली थोरमोटे-पाटील, शोभाताई ढमाले, विलास बँक व्हा.चेअरमन चंद्रकांत देवकते, कासारवाडी उपसरपंच जयदेव मोहिते, तानाजी फुटाणे, रघुनाथ शिंदे, प्रतापराव शिंदे, संचालक अतुल पाटील, प्रदीपकुमार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागाकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे. तूर, सोयाबीन, कांदा हमी भावाने घेण्याची घोषणा केली तो शेतीमाल गोदामात सडला जात आहे, दोन कोटी रोजगाराची घोषणा केली, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत. वर्षाला ०२ कोटी रोजगार उपलब्ध करू असे आश्वासन दिले, आता मेगाभरतीचे स्वप्न निवडणुकीच्या तोंडावर दाखवत आहे, गावागावात तरुण बेरोजगार आहेत. हे सरकार फक्त आश्वासनावर चालते आहे. हे उद्योगपतींचे भले करण्यात मश्गूल आहेत. त्यामुळे हे सरकार बदलण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापूर येथे स्थानिक आमदार विकासनिधी व जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निधीतून दलित वस्ती विकासकामासाठी १८ लाख रुपये निधी अंतर्गत रस्ते कामासाठी २० लाख रुपयाचा निधी, अंगणवाडी साठी ८ लाख रुपयाचा निधी, तीर्थक्षेत्रांच्या विकासाची ०५ लाख रुपयांचा निधी, स्मशानभूमी कंपाऊंड साठी ०६ लाख रुपयांचा विकास कामाची सुरुवात व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास उपसरपंच प्रवीण कुलकर्णी, सोसायटी चेअरमन दिलीप माने, व्हा. चेअरमन संतोष भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत नगराळे, उपाध्यक्ष उत्तम वरवटे, तुळशीराम भोसले, शेषेराव भादळगे, श्रीमत जाधव, शिवाजी भांदळगे, माजी सरपंच रमेश माने, वैजीनाथ भांगे, अनंत माने, विजय चव्हाण, रामकिसन पांचाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित ढमाले, सूत्रसंचलन रघुनाथ शिंदे यांनी केले.
Comments