HOME   लातूर न्यूज

महेश ढवळे यांना शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार

गरजू अन गरिबांसाठी केलेल्या कामांची शासनाने घेतली दखल


महेश ढवळे यांना शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार

लातूर: राज्य अन्न आयोगाचे सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड महेश ढवळे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ॲड महेश ढवळे यांनी अनेक गोरगरीब नागरिकांना शिधापत्रिका मिळवून दिल्या. गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. गरजूना रेशनचे धान्य मिळावे तसेच बंद पडलेल्या बँकांतील ठेवी संबंधितांना मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले. या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
मुंबईतील रवींद्र नाट्यगृहात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या हस्ते ढवळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रधान सचिव महेश पाठक, शिधापत्रिका विभागाचे दिलीप शिंदे, सहसचिव सतीश तुपे, उपसचिव भा. भा. पाटील, अप्पर महासंचालक तथा ग्राहक संरक्षण आयुक्त बिष्णोई आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दत्ता मिरकले, विद्युत तक्रार निवारण मंचाचे प्रा डॉ. सुधीर देशमुख, ग्राहक मंचाचे प्रभारी अध्यक्ष अजय भोसरीकर, शहराध्यक्षा ॲड सुनयना बायस, शहराध्यक्ष इस्माईल शेख, ॲड संगमेश्वर रासुरे, बळवंतराव कागले, कमलाकर डोके, युनूस चौधरी, प्रा एन जी माळी, प्रा माधव गुंडरे, आदींनी ॲड महेश ढवळे यांचे अभिनंदन केले आहे.


Comments

Top